Sunday, December 4, 2022

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून महिलेला अश्लील मेसेज?

WhatsApp Image 2022-08-26 at 5.05.26 PM
WhatsApp Image 2022-11-25 at 7.45.24 AM
previous arrow
next arrow

माय महाराष्ट्र न्यूज:बारामती येथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने एका महिलेला तिच्या व्हॉटसॲपवर अश्लील मेसेज पाठविल्यानंतर आता वरिष्ठांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने संबंधित महिलेला तिच्या व्हॉटस ॲपवर अश्लील मेसेज टाकून तिला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचे स्क्रीनशॉट काही जणांकडे आहेत. या बाबत आता वरिष्ठ

पोलिस अधिकारी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. या पोलीस अधिकाऱ्याच्या तावडीतून आम्हाला वाचवा आम्हाला मदत करा, अशी मागणी निनावी पत्राद्वारे एका वरिष्ठ पत्रकारांकडे करण्यात आली आहे.

यापूर्वीही बारामतीतच एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे एका मुलीसोबतचे फोटो व क्लिप व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्याची तातडीने उचलबांगडी केली होती. त्यावेळी

ते प्रकरण पार विधानसभेपर्यंत गाजले होते. त्या वेळीही वरिष्ठांनी शेवटच्या क्षणापर्यंत संबंधित अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचीच भूमिका घेतली होती.आता पुन्हा एकदा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे

हे मेसेज पोलिस खात्याच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहेत. या बाबत पोलिसांना अजून कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नसली तरी पोलिसांनी उपलब्ध माहितीच्या

आधारे चौकशी सुरु केलेली आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नमूद केले.या घटनेची कुणकूण लागताच संबंधित अधिकारी पंधरा दिवसांच्या रजेवर गेलेले असल्याची माहिती पुढे आली. या प्रकरणी

संबंधित महिलेला या पोलिस अधिकाऱ्याने काही अश्लील इमोजीही पाठवलेले असून तिला ‘आय लव्ह यू’ तसेच तुझा होकार आहे की नाही, ते एकदाच सांग. शेवटचं विचारतोय, असंही या मेसेजमध्ये

म्हटल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे रात्री अकरानंतर हे मेसेज केले गेले आहेत.पोलिसांच्या प्रतिमेबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी नुकतेच एक परिपत्रक प्रसिद्ध केले होते, त्यात

पोलिसांच्या वर्तणूकीबद्दल काही सूचना देण्यात आल्या होत्या. पोलिस खात्याच्या प्रतिमेशी ही बाब संबंधित असून आता बारामतीतील या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याविरुध्द नेमकी काय कारवाई कली जाते याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

- Advertisement -

ताज्या बातम्या

error: Content is protected !!