Sunday, December 4, 2022

भाजपच्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलीच्या हॉटेलात……नाना पेटोलेंचा खळबळजनक दावा

WhatsApp Image 2022-08-26 at 5.05.26 PM
WhatsApp Image 2022-11-25 at 7.45.24 AM
previous arrow
next arrow

माय महाराष्ट्र न्यूज:गो हत्येला विरोध करणाऱ्या भाजपचे पितळ उघडे पडले असून नायजेरियात लंपी आजार आढळून येतो.

नायजेरियातून चित्ता आणून भाजपने काय साध्य केले? असा प्रश्न उपस्थित करीत भाजप सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

तर गोमांस विक्रीला विरोध करणाऱ्या भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या गोव्यातील हॉटेलमध्ये गोमांस आढळून आल्याचा खळबळजनक आरोपही पटोले यांनी भंडारा येथे माध्यमांशी बोलताना केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर नाना पटोले माध्यमांशी

बोलत होते, राहुल गांधी यांची यात्रा नसून ती आता एक लोक चळवळ झाली आहे. देशात तिरंगा टिकवायचा असल्यामुळे या चळवळीला मोठा प्रतिसाद मिळत आहे.नायजेरिया देशात लंपी

या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. त्याच देशातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्ते भारतात आणले. देशात गरिबी, बेरोजगारी, महागाई, सीमावाद मोठ्या प्रमाणात असताना चित्ता आणून दिखावा

करण्याचे काम करण्यात येत आहे. भाजप शेतकरी विरोधी असून त्यांना बरबाद करण्यासाठी लंपी या रोगाची धास्ती दाखवून गोधन संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही पटोलेंनी यावेळी केला.

- Advertisement -

ताज्या बातम्या

error: Content is protected !!