Sunday, September 26, 2021

महिला हॉकी संघाशी बोलताना ‘ते’ वाक्य ऐकताच पंतप्रधान मोदी म्हणाले “अरे बापरे…

IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भारतीय महिला हॉकी संघाशी फोनवरुन संपर्क साधला. ग्रेट ब्रिटनविरोधात कांस्यपदकासाठी झालेला अटीतटीचा सामना एक गोलने गमावल्याने भारतीय महिला संघाचं ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं स्वप्न लांबवणीवर पडलं. भारतीय महिला कांस्यपदकाचा सामना ४-३ ने पराभूत झाल्यानंतर मोदींनी या खेळाडूंशी संवाद साधला.

तेव्हा मोदींनी भावूक झालेल्या आणि पराभावाने निराश होऊन रडणाऱ्या भारतीय महिला खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. यावेळी मोदींनी अनेक खेळाडूंचं नाव घेऊन चौकशी केली. एका खेळाडूला झालेल्या जखमेसंदर्भात मोदींनी आवर्जून चौकशी केली. मात्र जखम झाल्यासंदर्भातील सत्यता आधी त्यांनी पडताळून पाहिली. जेव्हा खरोखरच खेळाडूला जखम झाल्याचं संघाची कर्णधार राणी रामपालने खरोखरच जखम झाल्याचं सांगितलं तेव्हा मोदींनी बापरे म्हणत त्यावर प्रतिक्रिया दिली.

तुमची मेहनत पदक आणू शकलं नाही. मात्र तुमच्या घामाचा प्रत्येक थेंब कोट्यवधी भारतीय महिलांसाठी प्रेरणा आहे. मी संघाच्या सर्व सहकार्यांना आणि प्रशिक्षकांना शुभेच्छा देतो. निराश होऊ नका, असं म्हणत मोदींनी महिला खेळाडूंना धीर दिला.त्यानंतर मोदींनी नवनीतच्या डोळ्याला झालेल्या जखमेबद्दल विचारलं. “काल मी पाहिलं की नवनीतच्या डोळ्याला जखम झालीय,” असं विचारताच राणीने, “होय, तिच्या

डोळ्याला काय दुखापत झालीय,”  असं उत्तर दिलं. नवनीतला चार टाक पडल्याचंही राणीने मोदींना सांगितलं. त्यावर प्रतिक्रिया देताना मोदींनी, “अरे बापरे!, मी बघत होतो तिला..आता बरी आहे ना..तिच्या डोळ्यांना काही त्रास नाही ना..” असं विचारलं आणि फोन कनेक्शनमध्ये काहीतरी अडचण आली. त्यानंतर मोदींनी, “वंदना वगैरे सर्वजण चांगले खेळले. सलीमा पण चांगली खेळली,” असं म्हटलं.

मोदींशी बोलताना अनेक महिला खेळाडूंना भावना अनावर झाल्या आणि त्या रडताना दिसल्या. त्यावरुन मोदींनी सर्व महिला खेळाडूंना, “तुम्ही रडणं बंद करा. मला तुमच्या रडण्याचा आवाज येत आहे. देश तुमच्यावर गर्व करतोय. निराश होऊ नका. किती दशकानंतर हॉकीचा खेळ जो की भारताची ओळख आहे तो पुन्हा पुनर्जिवीत होत आहे. हे तुमच्या मेहनतीमुळे झालं आहे,” असं सांगितलं.

ताज्या बातम्या

काय चालले देशात:महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार

माय महाराष्ट्र न्यूज:महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुनही महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. एका महिला कॉन्स्टेबलने, तीन जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा...

नगर जिल्ह्यात आज ६९५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आज ६९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ७३६ इतकी झाली...

अत्यंत म्हत्वाचे:प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम? वाचा सविस्तर

माय महाराष्ट्र न्यूज: देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये घट होत असताना आता महाराष्ट्रही हळूहळू अनलॉक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली प्रार्थनास्थळं सात ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री...

PM kisan :शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्यात 2000 रुपयांऐवजी मिळणार 4000 रुपये ?

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे. मीडिया...

रोहित पवारांचा घरचा आहेर:युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन मोठा सावळा गोंधळ काल रात्री पाहायला मिळाला. हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात जाऊन पोहोचल्यानंतर त्यांना परीक्षा पुढे ढकलण्यात...

नगर ब्रेकींग: शेतकऱ्यासह १३ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :शेतामध्ये पेरणी सुरू असताना बांधावर घातल्याने झालेल्या अपघातात पेरणी यंत्रावर बसलेल्या शेतकऱ्याचा व १३ वार्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला वाडेगव्हाणमधील...
error: Content is protected !!