Friday, October 22, 2021

मोटारसायकल चालकांसाठी महत्वाची बातमी, केंद्र सरकारकडून नियमात मोठे बदल…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने दुचाकींच्या डिझाईन आणि मागील बसण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही नवीन नियम लागू केले आहेत. नवीन नियमांनुसार, दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या लोकांना काही नवीन नियम पाळावे लागतील.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नवीन नियमांनुसार, आता बाईकच्या मागील सीटच्या दोन्ही बाजूंना हात धरण्यासाठी होल्डर आवश्यक आहे. हे हँड या होल्डरमुळे बाईकच्या मागे बसलेल्या लोकांना सेफटी मिळेल. जेव्हा बाईक चालक अचानक ब्रेक लावतो तेव्हा, हे हॅंड होल्डर खूप उपयुक्त ठरते.

आतापर्यंत बहुतेक बाईक्समध्ये हे फीचर नव्हते. यासह, दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीसाठी दोन्ही बाजूंनी कव्हर असणे अनिवार्य करण्यात आले आहे. जेणेकरून मागील व्यक्तीचे कपडे मागच्या चाकात अडकू नयेत.

बाईकमध्ये आता हलका कंटेनर बसवण्याच्या सूचनाही केंद्राने दिल्या आहेत. या कंटेनरची लांबी 550 मिमी, रुंदी 510 मिमी आणि उंची 500 मिमी पेक्षा जास्त नसावी. जर हा कंटेनर बाईकच्या मागच्या बाजूला ठेवला असेल, तर फक्त ड्रायव्हरला बाईकवर बसण्याची परवानगी असेल. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर,

बाईकच्या मागे दुसऱ्या व्यक्तीला बसता येणार नाही. जर दुसरा व्यक्ती दुचाकीवर बसला असेल, तर ते नियमांचे उल्लंघन मानले जाईल.त्याचवेळी, जर हा कंटेनर मागील प्रवाश्यांच्या बसण्याच्या जागेच्या मागे ठेवला असेल, तर दुसऱ्या व्यक्तीला बसण्याची परवानगी दिली जाईल.

सरकारने टायरसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचनाही जारी केली आहे. या अंतर्गत जास्तीत जास्त 3.5 टन वजनाच्या वाहनांसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम सुचवण्यात आली आहे. या यंत्रणेतील सेन्सरच्या माध्यमातून चालकाला वाहनाच्या टायरमधील हवेच्या दाबाची माहिती मिळते.

तसेच टायर दुरुस्ती किटची शिफारस करण्यात आली आहे. त्याच्या अंमलबजावणीनंतर टायर संबंधीचे प्रॉबलम्स बाईक चालकाला येणार नाही.सरकार वेळोवेळी रस्ता सुरक्षेचे नियम बदलत राहते. गेल्या काही वर्षांत रस्ता सुरक्षेचे नियम कडक करण्यावर भर दिला जात आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!