Wednesday, October 27, 2021

नगर जिल्ह्यातील हे आमदार नवा इतिहास घडणार; देशातील सर्वात उंच भगवा झेंडा……

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भुईकोट किल्ल्यावर ७४ मीटर उंचीचा भगव्या रंगाचा स्वराज्य ध्वज लावला जाणार आहे. जगातील सर्वांत उंचीचा हा ध्वज असेल, अशी घोषणा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली. देशातील प्रमुख धार्मिक ठिकाणी हा ध्वज फिरवला जाईल.

त्यानंतर १५ ऑक्टोबर २०२१ रोजी हा स्वराज्य ध्वज खर्डा किल्ल्याच्या आवारात लावला जाईल, असे पवार यांनी जाहीर केले. हा ध्वज तयार झाला असून त्याचे संत-महंताच्या हस्ते पूजन करण्यात आले.

अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा किंवा शिवपट्टन किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. याच किल्ल्याच्या कातळांनी एकेकाळच्या निधड्या छातीच्या रांगड्या मावळ्यांचा पराक्रम पाहिला आहे. त्यामुळे या किल्ल्याच्या आवारात शौर्य आणि एकतेचे प्रतीक म्हणून ७४ मीटरचा जगातील सर्वात मोठा भगव्या रंगाचा स्वराज्य ध्वज लावला जाणार आहे.

देशातील प्रमुख धार्मिक ठिकाणी आणि पंढरपूरला हा ध्वज फिरवला जाईल. १५ ऑक्टोबर २०२१ रोजी स्वराज्य ध्वज खर्डा किल्ल्याच्या आवारात लावला जाईल. या ध्वजाविषयी मत व्यक्त करताना आमदार रोहित पवार म्हणाले, ‘हा भगवा रंगाचा स्वराज्य ध्वज कोणा एकाचा नसून सर्वांचा आहे. या ध्वजाच्या माध्यमातून कर्जत-जामखेड मतदारसंघाला नवी ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.

हा ध्वज जगभरातील पर्यटकांचं आकर्षण ठरणार आहे. सामर्थ्य, धैर्य, शक्ती, भक्ती, प्रगती यांचेही प्रतीक ठरेल आणि डौलाने फडकत राहील,’ असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

या भगव्या स्वराज्य ध्वजाचे संत-महंतांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर पुढील दोन महिने देशभरातील प्रमुख ७४ अध्यात्मिक व धार्मिक स्थळी, संतपीठांच्या ठिकाणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांवर हा ध्वज नेण्यात येणार आहे.

तेथे पूजन केल्यानंतर शेवटी पंढरपूरमध्ये या ध्वजाची पूजा करून १५ ऑक्टोबर रोजी तो मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत खर्ड्याच्या किल्ल्यात फडकविण्यात येणार आहे

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!