Wednesday, October 27, 2021

त्या दिवसापासून पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात येणार मंत्री प्राजक्त तनपुरेंचे मोठं विधान

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवरच पुन्हा निर्बंध कडक होणार का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि आपत्ती निवारण विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट माहिती दिली आहे.

‘प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. त्या ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत. दुसऱ्या लाटेतून जे अनुभव आले, ते लक्षात घेऊन सज्जता ठेवण्यात आली आहे. राज्यातील निर्बंध आता शिथील करण्यात आलेले आहेत.

तरीही नागरिकांनी काळजी घ्यायची आहे. राज्यात पुरेशा ऑक्सिजनची सोय करण्यात आली आहे. केंद्राकडून जास्तीचा ऑक्सिजन मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे ज्यावेळी राज्याची ऑक्सिजनची गरज ७०० टनावर जाईल, त्या दिवसापासून पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत,’ असं मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे.

नागरिकांनी सहकार्य केल्यास सर्वांच्या मदतीने या संकटावर मात करणे शक्य होणार आहे. सरकारी यंत्रणा सतर्क राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असंही ते म्हणाले.दरम्यान, नगर जिल्ह्यात पावसाने ताण दिल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत, त्यासंबंधी बोलताना ते म्हणाले, ‘यासंबंधी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लक्ष घातलं आहे.

परिस्थितीची पाहणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. मात्र, हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार एक-दोन दिवसांत चांगला पाऊस अपेक्षित आहे. त्यानुसार पाऊस झाला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल,’ असंही प्राजक्त तनपुरे म्हणाले.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!