Friday, October 22, 2021

महाराष्ट्रातील या आमदाराला 3 महिने तुरुंगवास

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांना आज न्यायालयाने एका प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. भुयार यांना 3 महिन्याचा तुरुंगवास आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 आमदार देवेंद्र भुयार यांनी पंचायत समिती सदस्य असताना 2013 साली शेतकऱ्यांच्या ज्वारी संदर्भात तीव्र आंदोलन केलं होतं. त्यावेळी दाखल गुन्ह्यात भुयार यांना कलम 353 अंतर्गत अमरावती जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. भुयार यांनी त्यावेळी तत्कालीन तहसीलदार राम लंके यांच्या विरोधात वरुड तहसील कार्यालयावर आंदोलन केलं होतं.

घटनेच्या दिवशी सुवर्ण जयंती राजस्व अभियान याची यशोगाथा तयार करत असताना देवेंद्र भुयार हे काही लोकांना घेऊन सभागृहात आले आणि तावातावाने बोलू लागले की, घटनेच्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शासकीय ज्वारी खरेदी केंद्र उशिरापर्यंत का बंद आहे व तुम्ही माझा फोन का काटला? असा प्रश्न विचारला.

तसंच तत्कालीन तहसीलदार यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि मारण्याची धमकी दिल्याचा आरोप देवेंद्र भुयार यांच्यावर करण्यात आला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी आमदार देवेंद्र भुयार यांच्या एका पोस्टवरुन चांगलाच वाद रंगला होता. बकरी ईदच्या शुभेच्छा पोस्टमध्ये आमदार भुयार यांनी गाईचे फोटो टाकले असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

भुयार यांच्या या कृतीचा निषेध म्हणून वरुडमधील त्यांच्या कार्यालयावर बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि भाजपने मोर्चा काढत भुयार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!