Monday, October 18, 2021

राज्यात २४ तासात वाढले इतके रुग्ण जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली व राज्य सरकारकडून निर्बंधांमध्ये शिथिलता दिली गेली असली, तरी देखील अद्यापही दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, डेल्टा प्लस या नवीन आजाराचे रूग्ण देखील आढळून येत आहेत.

शिवाय, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. दररोज राज्यात आढळणारी नवीन करोनाबाधितांची संख्यी ही करोनातून बरे होणाऱ्यांच्या तुलनेत कधी जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. आज दिवसभरात राज्यात ५ हजार ८११ रूग्ण करोनातून बरे झाले, तर ४ हजार १४५ नवीन करोनाबाधित आढळून आले. याशिवा, राज्यात आज १०० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला.

राज्यात आजपर्यंत एकूण ६१,९५,७४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.८६ टक्के एवढे झाले आहे.  आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,९६,८०५ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत एकूण १३५१३९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,११,११,८९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,९६,८०५ (१२.५३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,५३,१२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,५३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६२,४५२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील करोनाचा संसर्ग अद्याप पूर्णपणे कमी झालेला नसताना, आता डेल्टा प्लसच्या रूग्ण संख्येत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज दिवसभरात डेल्टा प्लसचे दहा नवीन रूग्ण आढळून आले आहे. तर, यामुळे आता राज्यभरातील एकूण रूग्ण संख्या ७६ झाली आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!