Monday, October 25, 2021

…तर मंत्री दत्तात्रेय भरणेंनी राजीनामा द्यावा, शिवसेनेच्या नेत्याची थेट मागणी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादीचे नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भर सभेत अपशब्द वापरल्यामुळे शिवसेना कमालीची नाराज झाली आहे. ‘जर दत्तात्रेय भरणे यांना आपल्या वक्तव्याचा जरा देखिल खेद असेल तर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा’ अशी मागणीही शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली.

पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत असताना राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या विधानाबद्दल विचारले असता नीलम गोऱ्हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.माणसाचा बुद्धी आणि मन जर का जागेवर नसते, मनी वसे ते स्वप्नी दिसे तसं ते तोंडावरती बाहेर येत, अस दत्ता भरणे यांचं झालं आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली ते मंत्री म्हणून काम करत आहेत, त्यांच्या विषयी जर कुणी असं बोलत असेल तर ते अत्यंत अयोग्य आहे’ अशी नाराजी गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

तसंच, दत्तात्रेय भरणे यांना आपल्या वक्तव्याचा जरा देखिल खेद वाटत असेल तर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीच नीलम गोऱ्हे यांनी केली.15 ऑगस्टच्या निमित्ताने सोलापूर महापालिकेच्या माझी वसुंधरा अभियानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलत असताना दत्तात्रेय भरणे

यांनी ‘मुख्यमंत्र्यांचे जाऊ द्या, मरू द्या, आपण आपलं करूया ना. मुख्यमंत्र्यांकडून मोठा निधी घ्यायचा आहे’ असं वक्तव्य भरणे यांनी भर व्यासपीठावर केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!