Monday, October 25, 2021

आमदार मोनिका राजळेंचा आरोप पालकमंत्र्यांना तशी माहिती जाणीवपूर्वक पुरवल्या जाते

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भगवानगड व 35 गावांच्या पाणी योजनेतील समाविष्ट असलेल्या 35 गावांची नावे तरी विरोधकांना माहिती आहेत का? विकास कामात खोडा घालून, पालकमंत्र्यांची दिशाभूल करून काहीही साध्य होणार नाही. योजनांचा अभ्यास, कामकाज पद्धती व निधीबाबत माहिती घेऊन व खात्री करूनच वक्तव्य करावे, असा सल्ला आमदार मोनिका राजळे यांनी विरोधकांचे नाव न घेता दिला.

पाथर्डी नगरपालिकेच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. नाथनगर येथे मुख्य कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर हे होते.यावेळी नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, श्री तिलोक संस्थेचे सचिव सतिष गुगळे, जि.प. सदस्य राहुल राजळे, सभापती सुनीता दौंड,

नगरसेवक बजरंग घोडके, महेश बोरुडे, रमेश गोरे, माजी उपनगराध्यक्ष बंडूशेठ बोरुडे, शहराध्यक्ष अजय भंडारी, पंचायत समिती सदस्य सुनील ओहोळ, विष्णुपंत अकोलकर, सुभाष केकान, वृद्धेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष आबासाहेब काकडे, नगरसेवक, नगरसेविका तसेच भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. राजळे म्हणाल्या की, आपणास मागील सरकारच्या काळात मुख्यमंत्री फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, मंत्री मुनगंटीवार यांच्याकडून मोठा निधी मतदार संघासाठी व शहरासाठी आणता आला. अनेक विकासकामे अंतिम टप्प्यात असून कामाचा दर्जा चांगला राखला जाईल. परंतु विरोधकांनी विकास कामात सहकार्य नाही तर किमान अडथळे आणु नयेत. परंतु राजकारण व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खोटे आरोप करून संभ्रम निर्माण केला जात आहे.

विरोधकांना निवडणुकांची घाई झाली आहे. कोणतीही माहिती न घेता, अभ्यास न करता काहीही खोटे आरोप केले जातात. लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांना प्रश्न मांडण्याचा अधिकार असतानाही बैठकीला प्रवेश नाकारला जातो, हा प्रकार दुर्दैवी आहे. अतिरेकी असल्यासारखी वागणूक व दंगल सदृश्य परिस्थिती असल्यासारखा पोलिस बंदोबस्त ठेवला जातो.

आढावा बैठकीस भाजपच नव्हे तर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना ही प्रवेश नाकारला. तालुक्यातील विरोधकांना कोणतीही शासकीय योजना माहित नाही. कोठून निधी मिळवला जातो हेही माहीत नाही. भगवानगड व 35 गावांच्या योजनेमधील 35 गावांची नावे तरी त्यांना माहीत आहेत का? असा सवाल करत विरोधकांनी जिल्हा परिषद अंतर्गत सत्ता असताना ही कोणतेही काम केले नाही.

विरोधकांची अशी दृष्टी व दृष्टिकोन चांगला नाही. पालकमंत्र्यांना चुकीची माहिती व मार्गदर्शन करणारी मंडळी जिल्ह्यात असून पालकमंत्र्यांना तशी माहिती जाणीवपूर्वक पुरवल्या जाते. असा आरोपही राजळे यांनी केला. भविष्यात कोणत्याही कामाचे श्रेय न घेता सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवू, विकासासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागले तर त्यासाठी चर्चेतून मार्ग काढू. अशी ग्वाही यावेळी आ. राजळे यांनी दिली.

विकास निधीसाठी संघर्ष करावा लागला. निधी नसतानाही अनेक विकासकामे केली. शहराच्या भविष्याचा विचार करून विकासकामे केली जात आहेत, असे आ. राजळे यांनी यावेळी सांगित

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!