Friday, October 22, 2021

नगर :तरुणाने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना २० दिवस उलटूनही अजून…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील अल्पवयीन मुलीचे एका तरुणाने अपहरण केल्याच्या निषेधार्थ काल (सोमवारी) श्रीरामपूरसह बेलापुरात ‘बंद’ पाळण्यात आला. अपहरणाची घटना घडून अनेक दिवस उलटूनही तपास लागला नसल्याने, हिंदुत्ववादी संघटनांनी ‘बंद’चे आवाहन केले होते.

बंदमुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह बेलापूर गावातील दुकाने आज दिवसभर बंद होती. या घटनेसंदर्भात हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिस ठाण्यासमोर मोर्चा व बेलापुरात रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर काल पुन्हा ‘बंद’ पाळण्यात आला. एका तरुणाने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडली.

याला सुमारे २० दिवस उलटूनही पोलिसांना आरोपीचा तपास लागत नसल्याच्या निषेधार्थ शिवप्रहार प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली आज बंद पाळण्यात आला. आज सकाळपासून शहरातील मेन रोड, शिवाजी रोड, नेवासे रोड, तसेच संगमनेर रस्त्यावरील दुकाने बंद होती. शहरातील मेन रोडवरील मुख्य बाजारपेठेसह सोनार लेनमधील दुकाने बंद होती.

अपर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या पथकाने श्रीरामपूरसह बेलापुरात बंदोबस्त ठेवला होता.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!