Saturday, October 23, 2021

मंत्री तनपुरे म्हणतात ज्यावेळी राज्याची ऑक्सिजनची गरज ७०० टनावर जाईल, त्या दिवसापासून

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवरच पुन्हा निर्बंध कडक होणार का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि आपत्ती निवारण विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट माहिती दिली आहे.

‘प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. त्या ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत. दुसऱ्या लाटेतून जे अनुभव आले, ते लक्षात घेऊन सज्जता ठेवण्यात आली आहे. राज्यातील निर्बंध आता शिथील करण्यात आलेले आहेत. तरीही नागरिकांनी काळजी घ्यायची आहे.

राज्यात पुरेशा ऑक्सिजनची सोय करण्यात आली आहे. केंद्राकडून जास्तीचा ऑक्सिजन मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे ज्यावेळी राज्याची ऑक्सिजनची गरज ७०० टनावर जाईल, त्या दिवसापासून पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत,’ असं मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे.

नागरिकांनी सहकार्य केल्यास सर्वांच्या मदतीने या संकटावर मात करणे शक्य होणार आहे. सरकारी यंत्रणा सतर्क राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असंही ते म्हणाले.

‘मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल आदर होताच. करोनाच्या काळात त्यांनी जी सावधपणे पावले उचलली त्यामुळे त्यांच्याबद्दलचा माझ्या मनातील आदर द्विगुणित झाला आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयांचे स्वागत केले.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...

फोन पे युजर्संना चांगला दणका! आता…

माय महाराष्ट्र न्यूज : पाणी आणि वीज बिल भरण्यासाठी, गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी तसेच, तुम्ही...

रोहित पवार कडाडले:या भाजप नेत्यांला पैशांचा घमेंड,फोडाफोडीचे करतात राजकारण

माय महाराष्ट्र न्यूज:जळगाव जिल्ह्या दौऱ्यावर आज राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार आले. प्रथम त्यांनी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर त्यांनी...

नगर जिल्हा पुन्हा हादरला:पतीने केला पत्नीचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातून काही दिवसापासून कोण दरोडेखोर अत्याचार अन्याय या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे अहमदनगर...

सावधान:चिकन मुळे कोरोनापेक्षा ही मोठ्या व्हायरसचे संकट

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना काळात जगभरात लाखो जणांचे जीव या विषाणूने घेतले. आता संसर्गाचा बहर ओसरला असली, तरी तो पूर्णतः आटोक्यात आलेला नाही. दरम्यान आता...
error: Content is protected !!