Monday, October 25, 2021

राज्यात डेल्टा प्लसचा धोका वाढत असताना आरोग्यमंत्री टोपेंची म्हत्वाची माहिती

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे  रुग्ण वाढत आहेत. आता या रुग्ण संख्येत 10 ने वाढ झाली असून डेल्टा प्लस रुग्णांची एकूण संख्या 76 वर पोहचली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मात्र राज्य सरकार आणि आरोग्य विभाग ICMR ने दिलेल्या प्रोटोकॉल नुसार सर्व काळजी घेत असून सर्व डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या कोरोना रुग्णांना आयसोलेट करून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. या डेल्टा व्हेरिएंटची बाधा झालेल्या कोरोना रुग्णांच्या संपर्कातील

नागरिकांचा शोध घेऊन त्यांच सुद्धा अलगीकरण करण्यात येत आहे त्यामुळे मात्र घाबरण्याचे कारण नाही असं आरोग्यमंत्री म्हणाले आहेत.राज्यातील कुठल्या जिल्ह्यात डेल्टा प्लसचे किती रुग्ण?

जळगाव – 13
रत्नागिरी – 15
मुंबई – 11
कोल्हापूर – 7
ठाणे, पुणे – प्रत्येकी 6
पालघर, रायगड – प्रत्येकी 3
नांदेड, गोंदिया, सिंधुदुर्ग – प्रत्येकी 2
चंद्रपूर, अकोला, सांगली, नंदूरबार, औरंगाबाद, बीड – प्रत्येकी एक रुग्ण

आतापर्यंत राज्यात आढळलेल्या 76 डेल्टा प्लस रुग्णांपैकी 37 रुग्ण पुरुष असून 39 स्त्रिया आहेत. या 76 रुग्णांपैकी 10 जणांचे दोन्हीही कोविड लस डोस झालेले आहेत तर 12 जणांनी केवळ 1 डोस घेतलेला आहे. लसीकरण झालेल्यांपैकी दोन व्यक्तींनी कोवॅक्सिन तर इतरांनी कोविशिल्ड लस घेतलेली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!