Wednesday, October 27, 2021

मुंबईतील अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप;इंटिरिअर डिझायनरकडून विनयभंग

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:इंटिरिअर डिझायनरने विनयभंग केल्याचा आरोप मुंबईतील अभिनेत्रीने केला आहे. फ्लॅटमधील कामावरुन वाद झाल्यानंतर आरोपीने आपला विनयभंग केल्याचा दावा महिलेने केला आहे. या प्रकरणी मुंबईतील ओशिवारा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मुंबईत कार्यरत असलेल्या संबंधित अभिनेत्रीच्या विनयभंगाच्या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीच्या फ्लॅटमध्ये इंटिरिअरचे काम करणाऱ्या डिझायनरने आपला विनयभंग केल्याचा दावा तिने केला आहे. आपल्या अपार्टमेंटमध्ये केलेल्या अंतर्गत सजावटीच्या कामावरुन त्याच्याशी झालेल्या

भांडणानंतर त्याने विनयभंग केला, असा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी मुंबईतील ओशिवारा पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु कोणालाही बेड्या ठोकण्यात आलेल्या नाहीत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

अभिनेत्रींच्या विनयभंगाचे प्रकार याआधीही मुंबईत
दरम्यान, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुंबईत विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. गाडी अडवून मद्यपीने अभिनेत्रीला धक्काबुक्की केल्याचा आरोप झाला होता. यानंतर विनयभंग प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली होती.

आरोपीने दारु पिऊन आपली गाडी तक्रारदार अभिनेत्रीच्या गाडीसमोर उभी केली होती. त्यानंतर अभिनेत्रीने त्याला गाडी बाजूला घेण्यास सांगितलं. मात्र याचा राग अनावर झाल्यामुळे आरोपीने शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा आरोप झाला होता.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!