Monday, October 18, 2021

या महिना अखेरपर्यंत शाळा नको, टास्क फोर्सचा इशारा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात कोरोनाचं प्रमाण काही अंशी घटताना दिसत असल्याचं चित्र पाहत राज्य शासनाच्या शिक्षण विभागानं 17 ऑगस्टपासून निर्बंध शिथिल असणाऱ्या भागांमध्ये सर्व कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंधांचं पालन करत शाळा सुरु होणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली होती.

पण, सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत शाळा सुरु व्हायला नकोत, अशा इशारावजा सूचना टास्क फोर्सनं राज्य सरकारला केल्या आहेत.कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता राज्यातील शाळा सप्टेंबर अखेरपर्यंत सुरु करु नयेत अशा सूचना टास्क फोर्सनं राज्य सरकारला केल्या. कोरोनाच्या

पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं घातलेल्या विविध निर्बंधांबाबत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही प्रश्न उपस्थित करत टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांना पत्र पाठवलं होतं. ज्यावर डॉ. ओक यांनी लेखी स्वरुपात उत्तर देत काही गोष्टी अधिक स्पष्टपणे मांडल्या. त्यामुळे आता राज्य सरकार पुन्हा एकदा टास्क फोर्सच्या या इशाऱ्याचा विचार करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, एकिकडे शाळांबाबतचं चित्रच स्पष्ट नसताना तिथं राज्य सरकारकडून महाविद्यालयं सुरु करण्याचीही तयारी दाखवण्यात आली आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीच काही दिवसांपूर्वीच राज्यात महाविद्यालयं सुरू करण्यात येतील असं सूचक वक्तव्य केलं होतं. 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरच्या काळात महाविद्यालयं सुरु करण्याचा विचार असल्याचं ते म्हणाले होते.

दरम्यान मागील काही दिवसांपासून सुरु असणारी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा आणि त्यानंतर आता राज्यात वाढणारे डेल्टाचे रुग्ण पाहता शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभाग परिस्थितीचा पुनर्विचार करुन शाळा आणि महविद्यालयांबाबत सावधगिरीचा निर्णय घेणार का याकडेच विद्यार्थी आणि पालकांचंही लक्ष असणार आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!