Monday, October 18, 2021

सावधान नगर जिल्ह्यात:पैसे दुप्पटचे अमिष, साडेचार लाखांना लुबाडले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

 

माय महाराष्ट्र न्यूज:पैसे दुप्पट करून देण्याचे अमिष दाखवून एका व्यवसायिकाला दोघांनी साडेचार लाखांना गंडा घातला. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव फाटा येथील साईकृपा कारखान्याजवळ ही घटना घडली. सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे व्यवसायिक दत्तात्रय शेटे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शेटे यांच्यावर करमाळा येथील एका बँकेचे कर्ज होते. ते फेडण्यासाठी त्यांना पैशाची गरज होती. ओळखीतून एका जणाने श्रीगोंद्यात पैसे दुप्पट करून देणारे लोक असल्याचे त्यांना सांगितले. शेटे यांची आरोपींसोबत ओळख व बैठका घडवून आणण्यात आल्या. पैसे दुप्पट करण्याच्या मोहात अडकवून आरोपींनी शेटे यांना हिरडगाव फाट्यावर

बोलाविले. त्यांच्याकडून साडेचार लाख रूपये रोख रक्कम घेण्यात आली व हातात तांदूळ, लिंबू, फुले ठेवुन सदरची रक्कम ही भगव्या कपड्यामध्ये पॅक करून कारच्या डिक्कीमध्ये ठेवली.शेटे यांना मोटारीला प्रदक्षिणा घालण्यास सांगून डिक्कीमधील रोख रक्कम काढुन घेवुन फिर्यादीची विश्वास घात करुन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित गट करत आहेत.

 

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!