Wednesday, October 27, 2021

चिंता वाढली! डेल्टा प्लस18 वर्षाखालील इतक्या जणांचा समावेश

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे आणखी दहा रुग्ण आढळले असून, आतापर्यंत ७६ रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे सोमवारी देण्यात आली. कोरोना नियंत्रणासाठी विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोमिक सिक्वेंसिंग) नियमित करण्यात येत आहे. जनुकीय क्रमनिर्धारण हे प्रयोगशालेय सर्वेक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

ते दोन प्रकारे करण्यात येत आहे :१) सेंटीनल सर्वेक्षण : राज्यातील पाच प्रयोगशाळा आणि पाच रुग्णालयांची निवड सेंटीनल सेंटर म्हणून करण्यात आलेली आहे. हे प्रत्येक सेंटीनल सेंटर दर पंधरवड्याला १५ प्रयोगशालेय नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था या संस्थांना पाठवते.

२) ‘सीएसआयआर’ सोबत समन्वय :महाराष्ट्र शासनाने जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणास गती मिळावी, यासाठी कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲड इंडस्ट्रिअल रिसर्च संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स ॲड इंटिग्रेटेड बायॉलॉजी या प्रयोगशाळेसोबत करार केला असून, या नेटवर्कद्वारे दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यातून १०० नमुन्यांची तपासणी करण्यात येते.

आणखी दहा रुग्णांचे निदानइन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स ॲड इंटिग्रेटेड बायॉलॉजी या प्रयोगशाळेने राज्यात आणखी १० डेल्टा प्लस रुग्णांचे निदान केले आहे. यापैकी सहा रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील, तीन रत्नागिरी जिल्ह्यातील तर एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. हे दहा रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत आढळलेल्या डेल्टा प्लस रुग्णांची संख्या ७६ झाली आहे. या जनुकीय क्रमनिर्धारण तपासणीतून राज्यात ८० टक्क्यांहून अधिक नमुन्यांमध्ये ‘डेल्टा’ व्हेरियंट आढळत असल्याचे दिसते.डेल्टा प्लस रुग्णासंबंधी माहिती — वयोगट :१८ वर्षांखालील रुग्णसंख्या : ९१९ ते ४५ वर्षे गटातील रुग्ण : ३९४६ ते ६० वर्षे गटातील रुग्णसंख्या : १९६० पेक्षा जास्त वयोगटातील रुग्ण : ९

डोस घेतलेले २२ रुग्ण- डेल्टा प्लसच्या ७६ रुग्णांपैकी १० जणांचे दोन्हीही कोरोना प्रतिबंधक लशीचे डोस झालेले आहेत तर १२ जणांनी केवळ १ डोस घेतला आहे.- लस घेतलेल्यांपैकी दोन जणांना कोवॅक्सिन तर इतर सर्वांनी कोविशिल्ड लस घेतलेली.- आजाराचे स्वरूप : या रुग्णांपैकी ३७ रुग्ण हे लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असणारे होते.

त्यामुळे रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता भासली नाही. ७६ रुग्णांपैकी ७१ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.- मृत्यू : या ७६ रुग्णांपकी ५ जणांचे मृत्यू (३ पुरुष, २ स्त्रिया)

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!