Wednesday, October 27, 2021

शरद पवारांनी फक्त पुतण्या, मुलगी, नातवालाच मोठे केले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आरक्षणाच्या मुद्द्यापासून नेहमी पळ काढणारे खासदार शरद पवार यांना अखेर ओबीसी आरक्षणाबद्दल आपली भूमिका मांडावी लागली. यातच बहुजनांचा विजय आहे, असे विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

शरद पवार यांच्या करामतींमुळेच मराठा आरक्षण गेले असून आता अचानकपणे पवारांचे ओबीसींप्रतीचे प्रेम उफाळून का आले? जातीयवादी राजकारण करणाऱ्यांना २०११ च्या जनगणनेचा जातीनिहाय अहवाल हवाय कशाला? अशा प्रश्नांची सरबत्तीही गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षणाबद्दल मांडलेल्या भूमिकेवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमदार पडळकर म्हणाले, असं म्हणतात की शरद पवार हे कुठलेही काम हेतुशिवाय करत नाहीत आणि खरा हेतु कधी दाखवतही नाहीत. पण मला त्यांना एकच सांगायचं आहे.

केंद्राने ताट वाढलंय खरे आहे. तुमचे हात पण बांधले गेले आहेत तेही खरे आहे. पण हे हात कुणामुळे बांधले गेले? केंद्रामुळे की आपल्या पै-पाहुण्यांच्या प्रेमामुळे? उभ्या आयुष्यात तुम्ही फक्त पुतण्या, मुलगी, नातू यांनाच मोठे केले. जेव्हा जेव्हा आपण सत्तेचा भाग बनलात तेव्हा तेव्हा आपल्या करामतीने मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण घालवले.

‘जो २०११ सालचा जनगणना अहवाल तुम्ही आता मगाताय त्यातला घोळ तुम्ही सहभागी असलेल्या मनमोहन सिंग सरकारनेच घातला आहे. भागीदारी तुमची, पाप तुमचे आणि बोंबा मात्र मोदी सरकारच्या नावाने ठोकायच्या, अशी तुमची स्थिती आहे. मला जातीयवादी विष पसरवणाऱ्यांना हेच विचारायचे आहे की, जातनिहाय जनगणनेचा डेटा तुम्हाला कशाला हवाय?

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाकरिता तुम्हाला इंपेरिकल डेटा द्यायचा आहे आणि मराठा आरक्षणाबाबात आपण अजून त्यांना मागासलेले सिद्ध करण्याची कोणतीही प्रक्रियाच सुरू केलेली नाही.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!