Sunday, September 26, 2021

 ICCने टी 20 वर्ल्ड कप 2021 चे वेळापत्रक जाहीर ; ‘या’ दिवशी भारत- पाक येणार आमने-सामने

IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ICCने टी 20 वर्ल्ड कप 2021 चे वेळापत्रक जाहीर केलं आहे. टी 20 वर्ल्ड कप 2021 मॅच 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत आणि त्याचा अंतिम सामना म्हणजेच फायनल 14 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे.

भारत आणि पाकिस्तान संघ एकाच गटात आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 24 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये खेळला जाईल. टी -20 वर्ल्ड कपचे सामने यूएई, ओमान, अबू धाबी, दुबई आणि शारजाह येथे होणार आहेत. 8 देशांचे क्वालीफाइंग मॅच 23 सप्टेंबरपासून सुरू होतील.

टी 20 वर्ल्ड कप 2021 चे ग्रुप खालीलप्रमाणे आहेत.

राउंड-1:

ग्रुप A: श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड आणि नामिबिया
ग्रुप B: बांगलादेश, स्कॉटलंड, पापुआ न्यू गुएना (पीएनजी) आणि ओमान

सुपर -12:

ग्रुप A: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, A 1 आणि B 2
ग्रुप B: भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, A 2 आणि B 1.
क्वालीफाइंग मॅचच्या सामन्यात श्रीलंका, बांगलादेश आणि आयर्लंड सहभागी होणार आहेत. यावेळी सुपर 12 संघांना 2 गटांमध्ये विभागले गेले आहे. सुपर -12 सामन्यांपूर्वी क्वालीफाइंग मॅच खेळले जातील.

भारताचा ग्रुप 2 मध्ये समावेश

ग्रुप 2 मध्ये भारताचा समावेश आहे. 24 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महान सामन्याने गट 2 ची सुरुवात होईल. 26 ऑक्टोबर रोजी शारजाहमध्ये पाकिस्तानचा पुन्हा न्यूझीलंडशी सामना होईल. ग्रुप सामने 8 नोव्हेंबर रोजी संपतील. ज्यामधील A ग्रुपमधील दुसऱ्या नंबरवरील राउंड 1 टीमसोबत भारत क्वालिफायर संघाशी सामना करेल.

सेमी फायनल मॅच

पहिली सेमी फायनल मॅच 10 नोव्हेंबर रोजी अबु धाबी येथे होणार आहे. दुसरी सेमी फायनल मॅच 11 नोव्हेंबरला दुबईत खेळली जाईल. दोन्ही सेमी फायनल मॅचसाठी राखीव दिवस ठेवले आहेत.

फायनल मॅच 14 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल

खेळातील फायनल मॅच 14 नोव्हेंबर रोजी दुबईत खेळली जाईल. फायनलसाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

काय चालले देशात:महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार

माय महाराष्ट्र न्यूज:महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुनही महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. एका महिला कॉन्स्टेबलने, तीन जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा...

नगर जिल्ह्यात आज ६९५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आज ६९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ७३६ इतकी झाली...

अत्यंत म्हत्वाचे:प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम? वाचा सविस्तर

माय महाराष्ट्र न्यूज: देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये घट होत असताना आता महाराष्ट्रही हळूहळू अनलॉक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली प्रार्थनास्थळं सात ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री...

PM kisan :शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्यात 2000 रुपयांऐवजी मिळणार 4000 रुपये ?

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे. मीडिया...

रोहित पवारांचा घरचा आहेर:युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन मोठा सावळा गोंधळ काल रात्री पाहायला मिळाला. हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात जाऊन पोहोचल्यानंतर त्यांना परीक्षा पुढे ढकलण्यात...

नगर ब्रेकींग: शेतकऱ्यासह १३ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :शेतामध्ये पेरणी सुरू असताना बांधावर घातल्याने झालेल्या अपघातात पेरणी यंत्रावर बसलेल्या शेतकऱ्याचा व १३ वार्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला वाडेगव्हाणमधील...
error: Content is protected !!