Wednesday, October 27, 2021

सोन्याची किंमत विक्रमी स्तरापेक्षा अजूनही 9000 रुपयांनी स्वस्त

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय वायदे बाजारात आज सोन्याच्या किमतीत किंचित घट झाली. मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर ऑक्टोबर वायदा सोने 0.03 टक्क्यांच्या कमकुवततेसह व्यवहार करीत आहे. मात्र, चांदीचे भाव वाढत आहेत.

सप्टेंबर फ्युचर्स चांदी 0.24 टक्क्यांच्या उच्चांकासह व्यापार करीत आहे. गेल्या व्यापार सत्रात अस्थिर व्यापारात सोने 0.47 टक्क्यांनी वाढले होते, तर चांदीने 0.54 टक्क्यांची वाढ नोंदवली होती.

गेल्या आठवड्यात सोन्याची किंमत 45,600 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या चार महिन्यांच्या नीचांकावर आली होती. यानंतर सोन्यात थोडी सुधारणा झाली आणि किंमत आता 10 हजार रुपये प्रति 47,000 पार केली आहे. गेल्या वर्षी सोन्याची किंमत 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या विक्रमी पातळीवर पोहोचली.

मंगळवारी एमसीएक्सवरील ऑक्टोबर फ्युचर्स सोन्याचे भाव 13 रुपयांनी कमी होऊन 47,212 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. MCX वर सप्टेंबर चांदीच्या वायदाची किंमत 153 रुपयांनी वाढून 63,610 रुपये प्रति किलो झाली.

सोन्यात मोठी घसरण होण्याचा अंदाज

सोन्याच्या गुंतवणूकदारांना यूबीएस ग्रुपने इशारा दिलाय. ते म्हणतात की, कोरोनानंतर आर्थिक सुधारणेला गती मिळत आहे. यूएस जॉब मार्केट डेटा अपेक्षेपेक्षा चांगला बाहेर आलाय. अशा परिस्थितीत फेडरल रिझर्व्ह वेळापूर्वी व्याज वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते.

यूबीएस समूहाच्या कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही रणनीतिक स्थितीत असाल तर या गुंतवणुकीतून बाहेर पडा. जर तुम्ही रणनीतिकदृष्ट्या गुंतवणूक केली असेल तर हेजिंग करा. यूबीएस समूहाचा अंदाज आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1600 डॉलर आणि चांदी 22 डॉलरच्या पातळीवर येऊ शकते.

याउलट गोल्डमन सॅक्स म्हणतो की, सोने पुन्हा 2000 डॉलरच्या पातळीवर पोहोचेल.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!