Monday, October 25, 2021

खूशखबर! पीएम किसानचे पैसे दुप्पट होणार, सरकारची नेमकी योजना काय?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज: पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 2000 रुपयांऐवजी 4000 रुपयांचे हप्ते येऊ शकतात. माध्यमांच्या अहवालांवर विश्वास ठेवायचा झाल्यास मोदी सरकार लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांना गिफ्ट देऊ शकते.

अहवालानुसार, केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ची रक्कम दुप्पट करण्याचा विचार करीत आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना 6000 रुपयांऐवजी दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 12000 रुपये मिळू शकतात.

वार्षिक 6,000 रुपये दिले जातात

मीडिया रिपोर्टनुसार, बिहारचे कृषिमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी अलीकडेच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची दिल्लीत भेट घेऊन पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मिळत असलेली रक्कम दुप्पट करण्याबाबत चर्चा केली. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

हप्ते कधी येतात माहीत आहे का?

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 6,000 रुपये पाठवले जातात. हे पैसे 3 हप्त्यांमध्ये पाठवले जातात. प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये पाठवले जातात. दर 4 महिन्यांनी एक हप्ता येतो. पीएम किसान पोर्टलनुसार, योजनेचा पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्चदरम्यान येतो.

दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलैदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतो. तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जातो.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!