Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी घडला धक्कादायक प्रकार; याठिकाणी राष्ट्रध्वज उलटा फडकला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :देशाचा स्वातंत्र्य दिन कर्जत शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत तिरंगा उलटा फडकला. उलटा फडकलेला राष्ट्रध्वज पाहण्यासाठी कर्जतकरांनी मोठी गर्दी केली होती. स्टेट बॅंकेच्या या हलगर्जीपणाबददल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. कर्जत- कुळधरण रोडलगत शहाजीनगर भागात स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. कर्जत तालुक्यातील ही एकमेव शाखा आहे. यामुळे स्टेट बँक ग्राहकांना नेहमीच हिन वागणूक देत आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया कर्जत शाखेतील अधिकारी व कर्मचारी ग्राहकांशी अरेरावीची भाषा, तुच्छ वागणूक यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे.

या प्रकारामुळे या शाखेची रँकिंग खालावली आहे.शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनी ग्राहकांना महत्व दिले नाही. ते यावर थांबले नाहीत त्यांनी देशप्रेम सुद्धा बाजुला ठेवले की काय ? याची चर्चा रंगली. येथील अधिकारी व कर्मचारी यांनी १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण सोहळयालाच दांडी मारली. येथे अवघ्या तीन कर्मचाऱ्यांनी ध्वजारोहणा केले.

ध्वजाला सलामी नाही, राष्ट्रगीत नाही. फाॅरमेलीटी म्हणून झेंडावंदन केले.देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना या बँकेच्या शाखेत उलटा ध्वज फडकवला. या प्रकाराने कर्जत व परिसरात एकच चर्चा सुरू झाली आहे. या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

शिवाय सलग सुटटयांचा गैरफायदा घेत या शाखेतील अधिकार्‍यांनी ध्वजारोहणाला दांडी मारली यावरुन ते ध्वजारोहणाला किती गांभीर्याने घेतात हे अधोरेखित होते.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!