Monday, October 18, 2021

नगर ब्रेकींग:पोलीस निरीक्षकांच्या त्या क्लिप प्रकरणाची चौकशी पोलीस अधिकारी मिटके कडे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : मागील आठवड्यात नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे यांची ऑडिओ क्लिप विविध समाज माध्यमाद्वारे व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांची तात्काळ बदली नियंत्रण कक्ष अहमदनगर येथे पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील यांनी केली होती.

या ऑडिओ क्लिप ची चौकशी करण्याची मागणी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याने पुढील चौकशी श्रीरामपुर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे देण्यात आली आहे पोलिस ठाण्यातून मी कारवाईला येतोय, जेवढी वाहने काढून घेता येईल तेवढे घेऊन जा.

मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत सर्व बंद अशा आशयाची एका पोलीस अधिकारी व एक इसम यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप गुरुवारी नेवासा तालुक्यात व्हायरल झाली होती त्या क्लिप मध्ये पो.नि. करे समोरच्या व्यक्तीला ‘ तुम्ही पिंपळगाव मध्ये उच्छाद मांडला असल्याने सगळ्यांचे धंदे कायमस्वरूपी बंद करा मी पोलीस स्टेशन मधून पिंपळगाव येथे येण्यास निघालो आहे .

मी तिथे येण्याआधी जेवढे वाहने काढून घेऊन जाता येतील तेवढे काढून घ्या नाहीतर जेवढी वाहने मिळतील तेवढे जप्त करण्यात येतील.येथून पुढे माझा आदेश येईपर्यंत तुमचे काम बंद राहील ‘अशा आशयाची ऑडिओ क्लिप फेसबुक , व्हाट्सऍप आणि विविध समाज माध्यामा द्वारे व्हायरल होत आहे ही क्लिप कोणी व्हायरल केली ?

समोरील बोलणारा व्यक्ती कोण ? या प्रकरणात अजून कोणा कोणाचा समावेश आहे ? याची सविस्तर चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडून केली जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!