Friday, October 22, 2021

नगर जिल्ह्यातील या दोन तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पाथर्डी-शेवगाव हा दुष्काळी भाग असून, येथील शेतकरी  संकटात आहेत. दुष्काळ जाहीर करण्याबाबत मंत्रिमंडळात तातडीने निर्णय घेऊ. मुळा धरणाचे आवर्तन सोडणे आणि भगवानगड व पस्तीस गावांच्या पाणीयोजनेच्या प्रश्नामध्ये मी लक्ष घालतो.

आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, ॲड. प्रताप ढाकणे यांनी सुचविलेली विकासकामे करू. कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता विकासासाठी काम करण्याचा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पाथर्डी-शेवगावकरांना दिला आहे. पाथर्डी येथे कोरोना आढावा बैठकयेथील संस्कार भवनात शेवगाव-पाथर्डी तालुक्यांतील कोरोना स्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले,माजी आमदार चंद्रशेखर घुले, ॲड. प्रताप ढाकणे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सभापती डॉ. क्षितिज घुले, शिवशंकर राजळे,

नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, संजय बडे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण उपस्थित होते. मुश्रीफ म्हणाले, की कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे. शेवगाव-पाथर्डीत ४६४ जण कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. येणारी लाट रोखण्यासाठी कोरोनाचे नियम पाळावेत. लसीकरणासाठी चांगले काम करू. दुष्काळ जाहीर करण्यासाठी मंत्रालयात पाठपुरावा करू.

भगवानगड पाणीयोजनेसाठी मुंबईत बैठक घेऊन प्रश्न सोडवू. ॲड. प्रताप ढाकणे व राजश्री घुले यांनी, मुळाचे आवर्तन सोडावे, भगवानगड व पाथर्डी-शेवगावच्या पाणीयोजनेसाठी निधी द्यावा, अशा मागण्या केल्या.पाणीयोजना पुन्हा नव्याने मंजूरभगवानगड पाणीयोजनेला निधी द्यावा, मुळा चारीचे आवर्तन सोडावे, पाथर्डी- शेवगाव

पाणीयोजना पुन्हा नव्याने मंजूर करावी, दुष्काळी स्थितीबाबत निर्णय घ्यावा, अशाही मागण्या करण्यात आल्या. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी प्रास्ताविक केले. तहसीलदार श्याम वाडकर यांनी आभार मानले.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!