Wednesday, October 27, 2021

नगरमध्ये रात्री सात तास वाहतूक बंद वाचा सर्व माहिती

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर शहरातील स्टेशन रस्त्यावरील सक्कर चौक ते जीपीओ चौकादरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू असून, त्याचे बहुतांश खांब (पिलर) उभे राहिले आहेत. या खांबांवर सिमेंट प्लेटा टाकल्या जाणार असून, त्या जेसीबीच्या सहाय्याने उचलण्यात येणार आहे.

या कामासाठी मोठी यंत्रसामग्री लागणार असल्याने मध्यरात्री 12 ते सकाळी 7 या वेळेत या रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. दरम्यान, शहरातील अवजड वाहतूक रोखण्यासाठी हाईट बॅरिगेटस लावणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रफुल्ल दिवाण, मनपाच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक राम चारठाणकर, शहर अभियंता सुरेश इथापे, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले, उड्डाणपुलाचे काम किमान सहा महिने सुरू राहण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात 15 दिवसांसाठी स्टेशन रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक मध्यरात्री 12 ते सकाळी 7 अशी सात तास पूर्ण बंद ठेवली जाईल. याबाबत पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. अधिकृत आदेश त्यांच्याकडून जारी होतील. मध्यरात्रीनंतर सकाळी 7 वाजेपर्यंत या रस्त्यावर एसटी बसेसलाही परवानगी राहणार नाही.

आमदार जगताप म्हणाले, शहरातून अवजड वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी मध्यंतरी सक्कर चौकात आंदोलनाची तयारी केली होती. मात्र, पोलिस अधीक्षक पाटील व शहर वाहतूक शाखेसमवेत बैठकीत चर्चा झाली असून, सक्कर चौक ते कोठीपर्यंतचा रोड तसेच दिल्लीगेटमार्गे अवजड वाहतूक होणार नाही, असे ठरले आहे. तसेच शहरातून ही वाहतूक होऊ नये म्हणून आता हाईट बॅरिकेटस शहरातील विविध रस्त्यांवर लावले जाणार आहेत.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!