Saturday, October 23, 2021

पवार साहेब, तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहात का?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्यावर जोरदार टीका केलीय. शरद पवार तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहात का? तुमची सत्तेची खुर्ची उबवण्याची हौस कोणत्या जन्मात फिटणार आहे? अशी घणाघाती टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत घटना दुरुस्तीवर शरद पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरुन आमदार खोत यांनी ही टीका केली. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.1992 मध्ये 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार याबाबत आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय दिला होता.50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देण्यात येणार नाही, असं सांगितलं होतं.

केंद्राने नंतर घटना दुरुस्ती करून 10 टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली. राज्यांना ओबीसींची यादी तयार करून आरक्षणाचा निर्णय घेऊ शकता असं केंद्राने भूमिका मांडली आणि दुरुस्ती केली. पण त्याचा काही उपयोग होणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय. पवारांच्या या मुद्द्यावरुन सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

शरद पवार साहेब तुम्ही ज्येष्ठ आहात आणि तुम्ही कधीतरी खरं बोलणार आहात का? अजून किती वर्षे समाजा- समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा उद्योग करणार आहात? तसेच तुमची राजकारणाची आणि सत्तेची खुर्ची उबवण्याची हौस कोणत्या जन्मात फिटणार आहे? हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेला सांगा, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी पवारांवर केली.

102 व्या घटना दुरुस्तीमुळे राज्य सरकारला मागास ठरवण्याचा अधिकारी राहिला नाही, असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे गायकवाड समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात फेटाळला गेला. मात्र आता घटना दुरुस्ती करून राज्य सरकारला अधिकार मिळाला असेल, तर मग तुम्हा आता परत केंद्राकडे का बोट दाखवता? असा सवालही खोत यांनी विचारला.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!