Monday, October 25, 2021

म्हणून नगर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी परत केले सरकारनं दिलेले मोबाइल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अंगणवाडी सेविकांचे कामकाज ऑनलाइन करण्यासाठी सरकारने त्यांना मोबाइल हँडसेट पुरविले होते. मात्र, दोन वर्षांत काम वाढत गेले आणि मोबाइलची क्षमता कमी पडत केली. त्यातच दुरुस्तीचा खर्च परवडेना यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी त्यांना सरकारने दिलेले मोबाइल हँडसेट परत केले.

सुमारे दोन वर्षांपूर्वी दिलेले हे मोबाइल त्रासदायक ठरू लागल्याने तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी ३८१ मोबाईल हँडसेट घेऊन बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आले. तेथे त्यांनी आपल्याकडील मोबाईल परत केले. यामध्ये सुनीता कुलकर्णी, अनिता धस, रजनी निंबोरे, कांता घोडके, कृष्णा शिंदे, प्रमिला कांबळे, चंदा अनारसे, शोभा थोरात, दिपाली गावडे, स्वाती जाधव यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.

महिलांनी सांगितले की, सरकारी कामासाठी हे मोबाईल आम्हाला देण्यात आले होते. या मोबाईलची वॉरंटी दोन वर्ष होती, ती संपली आहे. मोबाईल अवघ्या दोन जीबी रॅमचा आहे. त्या तुलनेत लाभार्थ्यांची भरायची माहिती खूप जास्त आहे. यामुळे मोबाईल हँग होतात. लवकर गरम होतात. अतिशय निकृष्ट दर्जाचे हे मोबाईल आहेत.

त्यांच्या दुरुस्तीसाठी तीन हजारापासून आठ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. हा खर्च अंगणवाडीसेविकांकडून घेतला जात आहे. केंद्र सरकारने अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲप दिले आहे. मात्र, सरकारने दिलेल्या मोबाईलमध्ये हे ॲप डाऊनलोड होत नाही. त्यामुळे सेविकांना आपल्या खाजगी मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करावे लागत आहे. वास्तविक पाहता आपली मातृभाषा मराठी आहे.

यामुळे या हँडसेटमध्ये बनवायची माहिती देखील मराठीतून असावी. इंग्रजीमुळे माहिती भरण्यास अनेक अडचणी येत आहेत. याचा निषेध करत आम्ही सर्व हँडसेट सरकारला परत करत आहोत. आम्हाला नवीन चांगले अद्यावत हँडसेट मिळावेत व त्यामध्ये माहिती भरण्यासाठी मराठीचा वापर प्रामुख्याने व्हावा, असे महिलांनी सांगितले.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!