Monday, October 25, 2021

अण्णा हजारे यांच्या विरोधात राळेगणसिद्धीत आंदोलन ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशातील जाचक कृषी कायदे, वाढती बेरोजगार, वाढती महागाई आणि इंधन दरवाढ यामुळे देशातील नागरिक हैराण झाले आहेत. केंद्रातील मोदी सरकार सामान्यांची पिळवणूक करत असून देश अडचणीत आला आहे. या स्थितीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे चकार शब्द काढत नाहीत.

देशातील परिस्थितीवर अण्णांनी भूमिका घ्यावी, अशी मागणी पुण्यातील देश बचाव जनआंदोलन समितीने व्यक्त केली. अन्यथा राळेगणसिद्धी येथे जाऊन केंद्र सरकारविरुद्ध बेमुदत धरणे आंदोलनाची घोषणा समितीचे प्रमुख ऍड. रवींद्र रणसिंग यांनी केली.

पुण्यात झालेल्या या पत्रकार परिषदेस रणसिंग पवार, मारुती भापकर, विकास देशपांडे, रवींद्र देशमुख, अभय भोर, दीपक पाटील, दुर्गा भोर, सुरसे, संदीप बर्वे, मुकुंद काकडे आदी उपस्थित होते. अण्णांना पत्र पाठवून आंदोलनाचं नेतृत्व करा, अशी विनंती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नोटबंदीनंतर झालेली आर्थिक हानी, कोरोना लॉकडाऊन, वाढती महागाई, बेरजोगारी यामुळे संपूर्ण देशातील सामान्य जनता भरडली जात आहे. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये अत्यंत बेजबाबदार पद्धतीने नोटबंदी करण्यात आली. त्यामुळे देशातील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. उद्योग व्यवसाय बंद झाले. बेजबाबदार निर्णयांमुळे सरकारचे कराचे उत्पन्न घटले.

ही वित्तीय तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने सामान्य जनतेची लूट सुरू केली आहे. त्यासाठी भरमसाठ इंधन दरवाढ करण्यात आल्याचा आरोप रणसिंग यांनी केला.देशातील पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आहेत. देशात एवढं सगळ होत असताना अण्णा हजारे मात्र गप्प आहेत. भ्रष्टाचारातून देश बाहेर काढण्यासाठी आमच्यापैकी

अनेकजण अण्णांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र आता देश अडचणीत असताना अण्णा चकार शब्द काढत नाहीत. पुढील १५ दिवसांत अण्णांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नावर आमचं नेतृत्व करावं अन्यथा आम्ही राळेगणसिद्धी येथे जाऊन

केंद्र सरकारविरुद्ध बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचं, भापकर यांनी सांगितले. अण्णांनी केवळ आमच्या पाठिशी राहावं, केंद्र सरकारला जाब विचारावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!