Monday, October 25, 2021

सर्वसामान्य जनतेला चांगला दणका कारण….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सर्वसामान्य जनता आधीच महागाईने होरपळली आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात एकूण 25 रुपयांनी वाढ केली गेली आहे.

त्यामुळे आता सर्वसामांन्याना खिसा आणखी रिकामी करावा लागणार आहे. सातत्याने होत असलेल्या या दरवाढीमुळे सर्वसामांन्यामध्ये नाराजीचं वातावरण आहे.मायानगरी मुंबईत 14.2 किलो एलपीजी सिलिंडरसाठी आता 859.5 रुपये मोजावे लागणार होते. ही दरवाढ होण्याआधी मुंबईतील सिलेंडरचे दर हे  834.50 रुपये इतके होते.

कोलकातामध्ये सिलिंडरचा दर 861 रुपयांवरून 886 रुपये इतका झाला आहे. चेन्नईमध्ये सिलेंडरसाठी  875.50 रुपये मोजावे लागणार आहेत. लखनऊमध्ये एलपीजी सिलिंडरसाठी 897.5 रुपये द्यावे लागतील.  अहमदाबाद, गुजरातमध्ये एलपीजीसाठी 866.50 द्यावे लागतील. एकाबाजूला खाद्य तेल महागलंय. त्यात आता पुन्हा सिलेंडरच्या दरात वाढ होत असल्याने जगायचं तरी कसं, हा प्रश्न सर्वसामांन्यासमोर आवासून उभा आहे.

8 महिन्यात 165.50 रुपयांनी महाग
2021 च्या सुरुवातीपासून  ते आतापर्यंत सिलेंडरच्या दरात एकूण 165.50 दरवाढ झाली आहे.  दिल्लीत सिलेंडरची किंमत 694 रुपये होती, जी फेब्रुवारीमध्ये वाढवून 719 रुपये प्रति सिलेंडर करण्यात आली. 15 फेब्रुवारीला किंमत वाढवून 769 रुपये करण्यात आली.

यानंतर, 25 फेब्रुवारीला  किंमत कमी होऊन 794 रुपये झाली. मार्चमध्ये पुन्हा 819 रुपये झाले. एप्रिलच्या सुरुवातीला 10 रुपयांची कपात केल्यानंतर दिल्लीत घरगुती एलपीजीची किंमत 809 रुपयांवर गेली होती.तर डिसेंबर 2020 पासून आतापर्यंत सिलेंडरच्या दरात जवळपास 275 रुपयांनी वाढ झाली आहे.

व्यावसायिक सिलेंडर 68 रुपयांनी महागले आहेत. त्यामुळे आता 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरसाठी दिल्लीत 1हजार 618 रुपये मोजावे लागणार आहेत.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!