Wednesday, October 27, 2021

मोठी बातमी :हवामान खात्याने नगर जिल्ह्यात 18 ऑगस्टसाठी यलो अ‌ॅलर्ट जारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं येत्या एक ते दोन दिवसात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान विभागानं औरंगाबाद, जालना, परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी केला असून बुधवारी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने काल वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात पावसानं हजेरी लावली आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, लातूर, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, बुलडाणा, जळगाव, अहमदगर, धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला असून बुलडाणा,वाशिम, जालना, बीड, अहदनगर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना 18 ऑगस्टसाठी यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

पोषक स्थिती निर्माण झाल्याने राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. कोकण विभागासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात १७ आणि १८ ऑगस्टला काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हंगामात सरासरीपेक्षा उणा पाऊस झालेल्या उत्तर महाराष्ट्राला या कालावधीत पावसाचा दिलासा मिळू शकणार आहे.

पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण विभागात बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. काही भागांत मुसळधारांची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी आणि विशेषत: घाट विभागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसासह विजांचा कडकडाट होण्याचाही अंदाज आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!