Monday, October 25, 2021

आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून शेतकऱ्यांना मिळणार ‘हा’ मोठा फायदा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच अग्रेसर असणारे आमदार रोहित पवार यांनी आपल्या कार्यतत्परतेने आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कामांचा धडाका लावला आहे. मतदारसंघातील खर्डा (ता. जामखेड) येथे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून ३ हजार मे. टन क्षमतेचे गोदाम शेतकऱ्यांसाठी उभारले जाणार आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघात नागरिकांना सुविधांचा लाभ मिळावा यासाठी आमदार रोहित पवार यांच्याद्वारे विविध विकासकामांचे आकृतिबंध तयार करण्यात आले आहेत. यामध्ये आता खर्डा (ता. जामखेड) या ठिकाणी वखार महामंडळाच्यावतीने ३ हजार मे. टन क्षमतेच्या गोदामाचे बांधकाम करण्यात येणार आहे.

मतदारसंघातील शेतकरी बांधवांना याचा मोठा फायदा यामुळे मिळणार आहे. आपला शेतातील अधिकतम उत्पादित माल साठवणुकीसाठी या गोदामामुळे शेतकऱ्यांना सुविधा प्राप्त होणार आहे.

राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते खर्डा (ता. जामखेड) येथे वखार महामंडळाच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या ३ हजार मे. टन क्षमतेच्या गोदामाचे भूमिपूजन करण्यात आलं. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. भोसले, सीईओ क्षीरसागर, वखार महामंडळाचे एमडी तावरे आदी प्रशासकीय अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले की,”गोदामाचे बांधकाम काम पूर्ण झाल्यानंतर कमी भाव असताना माल न विकता शेतकऱ्यांना तो या गोदामात ठेवता येईल आणि भाव वाढल्यानंतर तो विकता येईल. या कामासाठी सहकार्य केल्याबद्दल राज्याचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे विशेष आभार मानले.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!