Saturday, October 23, 2021

राज ठाकरे नक्की नातू कोणाचे, प्रबोधनकारांचे की पुरंदरेंचे?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज: – महाराष्ट्रामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते हर्षल बागल यांनी केला आहे.

महाराष्ट्राचे सामाजिक सांस्कृतिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी नागपूर आणि गुजरातमधून राज ठाकरे यांना पुढे केले जात आहे. आगामी निवडणुकीत युती करण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडून हा प्रयत्न केला जात आहे. पण राज ठाकरे यांनी ठरवलं पाहिजे की इतिहासावर बोलत असताना आपण अभ्यास करून बोललं पाहिजे.

त्यामुळे ते बाबासाहेब पुरंदरे यांचे नातू आहेत की प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे नातू आहेत? असा सवाल देखील संभाजी ब्रिगेड प्रवक्ते हर्षल बागल यांनी केला आहे.’प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांनी पूर्ण महाराष्ट्राचे प्रबोधन त्यांच्या साहित्यातून केले. त्यांनी त्यांच्या रंगो बापुची नावाच्या 40 पानांच्या पुस्तकात पुरंदरे यांची सर्व चलाखी उघड केली आहे.

ते पुरंदरेच्या लेखनाला भटी लिखाण म्हणतात. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील हे कसले शाहीर? हा तर सोंगाड्या आहे, असे विधान केले होते. जेम्स लेनच्या नावाखाली जिजाऊंची व शिवरायांची बदनामी करणारे हेच ते पुरंदरे आहेत. पंढरपूरला अमरजित पाटील यांच्याकडे शिवाजी महाराजांचे रामदास स्वामी गुरू नाहीत, हे लेखी देऊन माफी मागावी लागली होती.

जेम्स लेन समर्थक बहुलकरांच्या तोडांला पुण्यात शिवसेना पदाधिकारी व शिवप्रेमींनी काळे फासले होते. त्यांना माफी मागायला राज ठाकरे यांनी भाग पाडले होते. त्यामुळे आपण प्रबोधनकरांचे नातू आहात की पुरंदरेंचे? ते आधी एकदा स्पष्ट करावे’, असा सवाल हर्षल बागल यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!