Monday, October 25, 2021

नगरमध्ये पैशांचा पाऊस पाडणारी ‘ती’ टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात पैशांचा पाऊस पाडून, फुलांवर पैसे ठेवून ते दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याच्या चर्चा अधूनमधून सुरू असतात. अनेक व्यापारी, व्यावसायिक आणि राजकीय मंडळीही याला बळी पडल्याचे सांगण्यात येते.

तालुक्यातीलच नव्हे तर बाहेरच्या लोकांचीही या तालुक्यात बोलावून लूट झाल्याची उदाहरणे आहेत. आता मात्र अशी एक टोळी पकडण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले आहे. पुणे जिल्ह्यातील या टोळीने श्रीगोंद्यात येऊन गुन्हे केले आहेत.

अशा घटना वारंवार घडत असल्या तरी फसले गेलेले शक्यतो पोलिसांकडे जाणे टाळतात. बदनामी नको म्हणून घटनेची वाच्यताही करीत नाहीत. करमाळा (जि. सोलापूर) येथील दत्तात्रय महादेव शेटे यांनी मात्र पुढे येऊन फिर्याद दिली. १४ ऑगस्टला पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने त्यांना साडेचार लाख रुपयांना फसविण्यात आले.

साधूच्या वेषातील दोघांना पैसे दुप्पट करून देतो, असे सांगत आपली फसवणूक केल्याची फिर्याद शेटे यांनी दिली होती. पोलिसांनी अनोखळी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला.या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना आरोपींबद्दल माहिती मिळाली.

पुणे जिल्ह्यातील थेरऊ (ता. हवेली) येथील आरोपी असे गुन्हे करीत असल्याचे त्यांना समजले. ढिकले यांनी पोलिस पथक पाठवून आरोपी संतोष साहेबराव देवकर (वय ४५) व अशोक फकिरा चव्हाण (वय ४५ दोघे रा. जाधवस्ती, थेऊर, ता. हवेली जि. पुणे) यांना अटक केली.

त्यांच्याकडे चौकशी केली असना त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. शेटे यांची फसवणूक केलेली रक्कम त्यांनी वाटून घेतली होती. संतोष देवकर याच्याकडून १ लाख ७० हजार तर चव्हाण याच्याकडून २ लाख, ५ हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले.

सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर, अंकुश ढवळे, पोलिस कर्मचारी गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादा टाके, अमोल कोतकर, प्रशांत राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास फौजदार रणजित गट करीत आहेत.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!