Sunday, October 17, 2021

नगर जिल्ह्यातील तीनही मंत्री शोभेच्या बाहुल्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे कोणालाही नोकऱ्या देण्यासाठी किंवा बदल्या करण्याचे भाव हॉटेलमधील मेनू कार्डप्रमाणे ठरले आहेत. सरकारने भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड मोडले आहेत, असा आरोप करतानाच नगर जिल्ह्यातील तीनही मंत्री फक्त शोभेच्या बाहुल्या ठरल्या आहे, अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

कोरोनाच्या काळात राज्यसरकारने लोकांना दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकार मदत देत नसल्याचा कांगावा करीत आहे. आम्ही मात्र कोरोना सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना आधार दिला. अशावेळी राज्यातील मंत्री फक्त भजे खाण्यासाठीच बसलेत काय, असा प्रश्नही विखे पाटल यांनी विचारला. सोनगाव (ता. राहुरी) ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

विखे पाटील म्हणाले, की आघाडी सरकारला कोणतेही चांगले काम करता आले नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी वित्त आयोगाचा निधी रुग्णवाहिकासाठी वळविला. त्याला आमचा आक्षेप नाही, परंतु वित्त आयोगाचे पैसे पक्षासाठी व कार्यकर्त्यांना मोठे करण्यासाठी वापरणे एवढेच काम पालकमंत्र्यांनी केले, यासारखे दुर्दैव नाही.

निधी मिळविण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला घटनेने दिला आहे. त्यांना हात लावण्याचा कोणाला अधिकार नाही, असे विखे यांनी स्पष्ट केले.कार्यक्रम अध्यक्षस्थानी मुळा- प्रवरा वीज संस्थेचे माजी संचालक सुभाष जांनजी अंत्रे होते. यावेळी ॲड. अप्पासाहेब दिघे, रमेश पन्हाळे, सुभाष ना. अंत्रे, पाराजी धनवट, जे. पी. जोर्वेकर,

सोनगाव व सात्रळचे सरपंच अनुक्रमे अनिल अनाप व सतिष ताठे, उपसरपंच किरण अंत्रे, कारभारी ताठे, साहेबराव नालकर, मच्छिंद्र अंत्रे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!