Wednesday, October 27, 2021

नगर जिल्ह्यातील या गावात विचित्र प्रकार :उघड्यावर शौचास बसणार्‍यांचे फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथे ग्रामपंचायतीने गावातील आरोग्य व स्वच्छता राखण्यासाठी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे गावातील उघड्यावर शौचास बसणार्‍यांची चांगलीच धांदल उडालेली आहे.

सोशल मीडियावर सदरचे फोटो व्हायरल झाल्याने गावात चर्चेला उधाण आले आहे. ही कारवाई करणारे ग्रामविकास अधिकारी चांगलेच चर्चेत आले आहेत.मंगळवारी पहाटे सरपंच, ग्रामविकास अधिकारी व काही ग्रामपंचायत सदस्य यांनी पहाटे पहारा देऊन उघड्यावर शौचास बसणार्‍यांचे फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारित केले.

त्यामुळे काल दिवसभर गावात मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले आहे.तालुक्यातील गोंडेगावात मोठ्या नागरिक प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी शौचास जात असल्यामुळे गावातील आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच आत्ताच करोनासारखा महाभयानक रोग कमी होत असताना

गावातील आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी गाव हागणदारी मुक्त व्हावे, म्हणून पदाधिकारी व अधिकारी प्रयत्नात आहेत. गावातील बाहेर शौचास जाणार्‍यांपैकी बर्‍याच नागरिकांच्या घरी वैयक्तिक शौचालय बांधलेले असून त्याचा वापर न करता ते सार्वजनिक ठिकाणी शौचास जात आहेत.

त्यामुळे सरपंच ग्रामविकास अधिकारी यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!