Sunday, October 24, 2021

कोरोना लशीमुळे पक्षाघाताचा धोका? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे जगभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला, तर जगात असे अनेक लोकं आहेत, ज्यांना कोरोना लशीवर अद्याप विश्वास नाही. कोरोना लशीच्या परिणामामुळे अनेकजण अजूनही लस घेण्यास कचरत आहेत.

अशातच कोरोना लशीमुळे पक्षाघाताचा धोका असल्याची धक्कादायक माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा लस लाभार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पण यातही सकारात्मक बातमी म्हणजे, कोरोना लशीच्या तोट्यांपेक्षा त्याचे फायदे अधिक असल्याचंही संबंधित संशोधनात म्हटलं आहे.

द लॅन्सेट इनफेक्षियस डिसीजेस जर्नल या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, चीननं तयार केलेल्या कोरोनाव्हॅक या लशीचे फायदे तोट्यांपेक्षा अधिक आहेत, पण काही रुग्णांत चेहऱ्याचा पक्षाघात झाल्याचं निष्पन्न झालं आहे. पण एक लाख रुग्णांमागे 4.8 लोकांना या चेहऱ्याच्या पक्षाघाताचा धोका असल्याचं हाँगकाँग विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटलं आहे.

खरंतर, कोरोनाव्हॅक ही निष्क्रिय विषाणूपासून तयार केलेली लस आहे. याचाच परिणाम म्हणून लस लाभार्थ्याच्या चेहऱ्याच्या एका भागाला बेल्स पाल्सी या दुर्मिळ चेहऱ्याच्या पक्षाघाताचा धोका आहे. पण या आजाराची लक्षणं सहा महिन्यांच्या आत नष्ट होतात. त्यासाठी कोणताही उपचार करावा लागत नाही, असंही

या संशोधनात सांगण्यात आलं आहे. चीनच्या कोरोनाव्हॅक आणि फायझर या दोन लशींच्या दुष्परिणांमाबाबत हाँगकाँग विद्यापीठात अभ्यास करण्यात आला असून त्यात लशीचा डोस घेतल्यानंतर पहिल्या 42 दिवसांत बेल्स पाल्सीची लक्षणं किती जणात दिसली याची याबाबत संशोधन करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!