Monday, October 18, 2021

धक्कादायक पुण्यातील: नववी पास तरुणी निघाली सेक्सटॉर्शनची मास्टरमाइंड; श्रीमंत तरुणांना FB वर हेरायची अन्…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: नववी पास असणाऱ्या एका महिलेनं सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्यासह इतर शहरातील अनेक व्यावसायिक आणि नोकरदार पुरुषांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात गुंतवल्याची घटना समोर आली आहे. आरोपी महिलेनं आपल्या नवऱ्याच्या मित्राच्या मदतीनं हे हनी ट्रॅपचं जाळ विणलं होतं.

बदनामी करण्याची भीती दाखवत आरोपींनी आतापर्यंत अनेक लोकांना गंडा घातला आहे. याप्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलिसांनी सेक्सटॉर्शन करणाऱ्या संपूर्ण टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मुख्य आरोपी महिला इयत्ता नववी पास असून तिचा पतीही गुन्हेगार वृत्तीचा असून सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. दरम्यान आरोपी महिलेची आपल्या गुन्हेगार पतीच्या गुन्हेगार मित्रासोबत ओळख झाली. या ओळखीतून त्यांनी सोशल मीडियावरून उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. आरोपींना आतापर्यंत पुण्यातीला अनेकांना आपल्या जाळ्यात गुंतवलं आहे.

समाजात आणि सोशल मीडियावर बदनामी होण्याच्या भीतीनं अनेकजण आरोपींच्या दबावाला आणि धमक्यांना बळी पडले आहेत. पण चार दिवसांपूर्वी एका व्यावसायिकानं धाडस दाखवत याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अवघ्या 72 तासांत मुख्य आरोपीसह हनी ट्र्रॅप करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे?
संबंधित आरोपींनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून पनवेल येथील व्यावसायिक नितीन दत्ता पवार (वय-31) याला हनी ट्रॅपच्या जाळ्यात गुंतवलं होतं. यानंतर आरोपींनी पवार यांच्याकडे खंडणीची मागणी केली. पण पवार यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानं सहा जणांच्या टोळीनं पवार यांना मारहाण केली.

यानंतर पवार यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अवघ्या काही तासांत सहा जणांना अटक केली आहे. आरोपींनी आणखी किती जणांना गंडा घातला याबाबत चौकशी केली जात आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!