Friday, October 22, 2021

रेल्वेत तब्बल इतक्या पदांसाठी भरती; आठवी पास देखील करू शकतात अर्ज!

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:रेल्वे भरती सेल, (RRC) उत्तर मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी देशभरातील उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. यासाठी इच्छुक उमेदवार केवळ rrcpryj.org वर RRC च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

उत्तर मध्य रेल्वेने प्रयागराज, आग्रा, झाशी आणि झाशी वर्कशॉपसह विविध विभागांमध्ये उपलब्ध असलेल्या 1,664 रिक्त पदांच्या जागांसाठी अर्ज मागवत असल्याची अधिसूचनाही जारी केलीय.

Indian Railways Recruitment 2021 : रिक्त पदांचा तपशीलप्रयागराज विभाग : यांत्रिक आणि विद्युत विभागात 703 रिक्त जागाआग्रा विभाग : 296 जागाझाशी विभाग : 480 जागाझाशी कार्यशाळा विभाग : 185 जागा

Indian Railways Recruitment मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे इतके असावे. दरम्यान, उमेदवारांचे वय 1 सप्टेंबर 2021 पासून मोजले जाईल, तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सूट दिली जाईल. वयोमर्यादेबद्दल संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पहावी.

प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी किमान 50% गुणांसह 10+2 प्रणालीमध्ये मॅट्रिक (वर्ग 10) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ट्रेड वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), वायरमन आणि सुतार यांच्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता आयटीआय प्रमाणपत्रासह 8 वी उत्तीर्ण असावी. तर SC, ST,

PWD किंवा महिला उमेदवारांना अर्ज फी भरावी लागणार नाही. इतर उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 200 रुपये भरावे लागतील. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 सप्टेंबर 2021 आहे.

ताज्या बातम्या

प्रेरणा पतसंस्थेचे संचालक आप्पासाहेब चंद्रे यांचे अपघाती निधन

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा येथील प्रेरणा पतसंस्थेचे संचालक आप्पासाहेब बाप्पू चंद्रे वय 42 यांचे गुहा ते राहुरी प्रवास करीत असताना राजश्री...

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...
error: Content is protected !!