Monday, October 25, 2021

आ रोहित पवारांनी दिल्या केंद्रीय अर्थमंत्र्यांना अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यामुळे देशभर एकच चर्चा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचा आज वाढदिवस आहे. निर्मला सितारामण यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिलेल्या शुभेच्छा सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहेत.

इंधनाच्या दरांचा संदर्भ देत निर्मला सीतारमण यांना रोहित पवारांनी वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्यात.ट्विटरवरुन निर्माला सितारमण यांना टॅग करुन रोहित पवारांनी या शुभेच्छा दिल्या. “देशाची तिजोरी सक्षमपणे सांभाळणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सितारमणजी आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपण पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं आणि त्यासाठी आपणास उत्तम आरोग्य लाभावं, ही प्रार्थना,” असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही निर्मला यांना शुभेच्छा दिल्यात. “निर्मला सितारमण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. भारतीय अर्थव्यवस्थेमधील अग्रगण्य सुधारणा आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांमध्ये त्या आघाडीचं नेत्या आहेत. तुमच्या दिर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो,” असं मोदी म्हणालेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच इंधनाच्या दरांमध्ये घट होण्याची शक्यता कमी आहे, असं मत निर्मला यांनी व्यक्त केलं होतं. उत्पादन शुल्कात कोणतीही कपात केली जाऊ शकत नाही, असं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच इंधनदरवाढीला सर्वस्वी काँग्रेसप्रणित युपीए सरकार जबाबरदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

“काँग्रेसप्रणित युपीए सरकारने १.४४ लाख कोटी रुपयांचे ऑइल बॉण्ड जारी करून इंधनाचे दर कमी केले होते. मी तशी चालबाजी करू शकत नाही. युपीए सरकारने घेतलेल्या निर्णयाचा भार सरकारी तिजोरीवर पडला आहे. त्यामुळे इंधन दरात घट होणं कठीण आहे,” असं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलंय. “काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने जारी केलेल्या ऑइल बॉण्ड्समुळे सरकारी तिजोरीवर भार पडत आहे.

व्याजापोटी सरकारने गेल्या पाच वर्षात ६२ हजार कोटी रुपयांचे व्याज दिले आहे. तसेच २०२६ पर्यंत अजून ३७ हजार कोटी रुपये व्याज भरावा लागणार आहे,”असंही अर्थमंत्री निर्मला सितारमण यावेळी म्हणाल्या.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!