Wednesday, October 27, 2021

विखे पाटीलांनी दिल्या भाजपा किसान मोर्चाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना या सुचना

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार केंद्र सरकारमध्ये नव्याने समावेश झालेल्या मंत्र्यांनी आपापल्या भागात जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. त्यासंबंधी विविध चर्चाही सुरू झाल्या आहेत. त्याचवेळी पक्षाकडून आणखी एका यात्रेचे संकेत मिळत आहेत.

पक्षाच्या किसान मोर्चातर्फे संवाद यात्रा काढून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचण्याची भाजपची योजना आहे. माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंबंधीच्या सूचना भारतीय जनता पक्षाच्‍या किसान मोर्चाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या संवाद यात्रेतून केंद्र सरकारच्‍या शेतकरी विषयक योजनांची माहिती शेतक-यांच्‍या बांधावर जावून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

करोनाच्या परिस्थितीतही भाजपने विविध आंदोलने, कार्यक्रम, उपक्रम आणि यात्रा या माध्यमातून लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नेते, कार्यकर्ते या माध्यमांतून सतत जनेतेमध्ये राहत आहेत. राज्यातील आघाडी सरकारविरोधात वातावरण

निर्माण करण्यासोबतच केंद्रातील भाजप सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी याचा उपयोग केला जात आहे. यामुळे करोनाच्या काळात संसर्ग पसरण्याची शक्यता असल्याची टीका होत असली तरी त्याची पर्वा न करता भाजपचे हे उपक्रम सुरू आहेत. सध्या केंद्रीय मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे.

यासोबतच आता शेतकऱ्यांसाठी अशीच एक संवाद यात्रा सुरू करण्याची पक्षाची तयारी सुरू असल्याचे दिसून येते. विखे पाटील यांनी यासंबंधीचे संकेत दिले आहे. २२ ऑगस्टला पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती आहे. राज्य सरकारतर्फे दरवर्षी तिथीनुसार नारळी पौर्णिमेच्या दिवशी हा दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विखे पाटील परिवारातर्फेही

विविध उपक्रम राबविले जातात. यापार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्‍या किसान मोर्चाच्‍या वतीने पदाधिका-यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये बोलताना विखे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी संवाद यात्रा काढण्याचे आवाहन केले‌.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!