Friday, October 22, 2021

नेवासा न्यायालयाने आदेशाने ‘समता शिक्षण संस्थे’च्या माजी अध्यक्ष व सचिवावर गुन्हा दाखल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:खरवंडी ता.नेवासा येथील समता शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेस शेतजमीन नसताना शेतीसाठी काढलेले कर्ज स्वताच्या फायद्यासाठी वापरले म्हणून नेवासा न्यायालयाच्या आदेशाने संस्थेचे माजी अध्यक्ष व सचिवावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने परीसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, समता संस्थेच्या जळके खुर्द (ता.नेवासा)येथील शिक्षण संस्थेत माजी अध्यक्ष अजित रामचंद्र फाटके व सचिव केशव आनंदा थोरात यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा नेवासा या बॅंकेकडून ठिबक सिंचन, पीककर्ज,मोटार व कंपाउंडसाठी २ लाख ४० हजार रुपये कर्ज काढले होते.

संस्थेला शेती नसताना व धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेतली नव्हती.बन्सी रामभाऊ म्हस्के यांनी पदाचा गैरवापर,खोटी कागदपत्रे बोगस ठराव केला म्हणून नेवासा येथील मे.ज्यु.डी.मॅजिस्ट्रेट वर्ग१ यांचे न्यायालयात दावा दाखल केला होता.

म्हस्के यांच्या तक्रारीनुसार न्यायालयाने आरोपी विरुद्ध भा.द.वि.कलम४२०,४६५,४६६,४६७,४६८ व ४७१नुसार गुन्हा दाखल करण्याचा आदेश करत आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे सुनावले. संस्थेच्या गुरुदास भास्करगिरी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेतीशाळा नसताना तत्कालीन सचिव थोरात व तत्कालीन अध्यक्ष फाटके यांनी सन २०१० मध्ये स्वतःच्या फायद्याकरीता कर्ज काढून वापरले आहे.असे तक्रारीत नमूद केले होते.

न्यायालयाने २१ऑगस्ट २०१३ रोजी गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता.थोरात यांनी पुढे अपील केले असता आदेश कायम राहीला.१७ सप्टेंबर २०१५ रोजी औरंगाबाद उच्च न्यायालयात अपील केले मात्र खालच्या न्यायालयानेच याबाबत निर्णय घेणेस सांगण्यात आले.फाटके व थोरात यांनी संगनमत करत पुरसिस देवून परस्पर विरोधी दावे काढून घेतले.

साक्षीदार म्हस्के यांनी सन २०१८ मधील तक्रार लक्षात घेवून न्यायालयाने ४ ऑगस्ट २०२१ रोजी माजी अध्यक्ष फाटके व सचिव थोरात वर गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.शिक्षणाच्या मंदीरात करण्यात आलेल्या गैरकृत्याची परीसरात चर्चा होत आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...
error: Content is protected !!