Wednesday, October 27, 2021

नगर जिल्ह्यातील या महिला नेत्या लागल्या विधानसभा तयारीला ;नाव वाचून तुम्हाला धक्का बसेल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:विधानसभा निवडणुकीला नक्कीच वेळ आहे मात्र निवडणुकीत उतरण्याचा निर्णय ऐनवेळी होतो. परिणामी विजय हुलकावणी देतो असेच काहीसे वाटल्याने यावेळच्या आमदारकीच्या प्रबळ उमेदवार समजल्या जाणाऱ्या काँग्रेस नेत्या अनुराधा नागवडे हटके फंडा वापरायला लागल्या आहेत.

त्यांनी शहरातील शनिचौकातील गर्दीचे ठिकाण असणाऱ्या हाॅटेलमध्ये चहाचे घोट घेत कार्यकर्ते व लोकांशी संवाद साधत ‘है हम तैयार’ अशीच काहीशी खुन्नस विरोधकांना देत लोकांमध्ये वेगळी छबी तयार करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसले.दिवंगत काँग्रेस नेते शिवाजीराव नागवडे यांच्या अनुराधा या सु्ष्ना आहेत. ‘बापूं’चे राजकारण कायमच वेगळ्या शैलीत राहिले.

ते मोटारीच्या काचा खाली घेत नसल्याचा आरोप विरोधकांनी सतत केला. त्यांनी या आरोपांना कधीच उत्तर दिले नाही. मात्र आजही ‘बापू’ हवे होते. हे सामान्यांचा काळजाला भिडणारे वाक्य त्यांची महती सांगून जाते.गावाकडील खिलारचा अमोल कोल्हेंमुळे संसदेत महिमा गेल्या दोन विधानसभा निवडणूका लढणार असे वाटत असतानाच तयारी नाही.

असे वाटल्याने थांबलेल्या अनुराधा नागवडे यांनी मात्र यंदा निवडणूकीला अजून अवधी असतानाच मैदानात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सकाळ’शी बोलताना त्यांनी मध्यंतरी ‘होय, विधानसभा लढणार आणि जिंकणारही’ असे सांगत विरोधकांना आव्हान दिले होते. त्याचा प्रत्यय आता येवू लागला आहे.

अनुराधा नागवडे या महिलांप्रमाणेच तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांच्याकडे तालुक्यातील लोक भावी आमदार म्हणून पाहतात हे कार्यकर्ते थेटपणे बोलू लागले आहेत. मात्र नागवडे कुटूंब लोकांमध्ये जात नाही, बसत नाही हा आरोप खराही आहे. त्यालाच शह देण्यासाठी आता अनुराधा नागवडे यांनी निर्णय घेतल्याचे दिसते.

शहरातील शनीचौक येथील चहासाठी प्रसिध्द असणाऱ्या उपसरपंच चहाची गोडी चाखण्यासाठी त्या थेट हाॅटेलमध्ये गेल्या. तेथे जात लोकांशी संवाद तर साधलाच शिवाय बसून चहाही घेतल्याने मोठी चर्चा रंगली आहे. त्यांची असणारी सध्याची क्रेझ वेगळीच असून त्यांनी अशा पध्दतीने लोकांमध्ये जात संवाद साधले तर विरोधकांना लवकर जागे व्हावे लागेल हेही वास्तव आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!