Friday, October 22, 2021

पुढील 24 तासांत मुंबईसह या जिल्ह्यांना झोडपणार पाऊस

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मागील काही दिवसांपासून राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामानाची स्थिती तयार झाली आहे. यामुळे राज्यात विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. काल उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि घाट परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे.

तर काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. यानंतर आजही राज्यातील विविध भागात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना आजही हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज उत्तर महाराष्ट्रासह उत्तर कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राज्यात तब्बल चौदा जिल्ह्यांना येलो अलर्ट तर एका जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्यानं आज नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, पालघर, मुंबई,

ठाणे, रायगड, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशीम, चंद्रपूर, आणि वर्धा अशा चौदा जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. याठिकाणी पुढील चोवीस तासात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्यानं आज यवतमाळ या एकमेव जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या राज्यात पावसाचा काहीसा जोर कमी होण्याची शक्यता आहे. उद्या पालघर, नंदूरबार, बुलडाणा, अकोले आणि वाशीम या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. उर्ववरित महाराष्ट्रात उद्या कोरड्या हवामानाची शक्यता आहे.

दुसरीकडे आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात पावसाच्या सरी कोसळत आहेत. सायंकाळनंतर याठिकाणी पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या राज्यांना हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!