Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:बलात्काराच्या गुन्ह्यात मुलास अडकविले बाहेर काढण्यासाठी दोन लाखांची मागणी; पुढे घडलं असे की

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:बलात्काराच्या गुन्ह्यात मुलास अडकविले आणि त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी एका महिलेने दोन लाख रुपयांची मागणी केली. या गुन्ह्यात सहआरोपी केलेल्या मुलीच्या आई वडिलांनी बदनामी झाली म्हणून एकाच वेळी राहते घरात आपली जिवणयात्रा संपविली.ही घटना अकोले तालुक्यातील चिंचावणे येथे मंगळवार दि. 17 ऑगस्ट 2021 रोजी 1 वाजण्याच्या सुमारास घडली.

यात सोमनाथ नामदेव कुलाळ व जिजाबाई सोमनाथ कुलाळ (रा. चिंचावणे) ही दोघे मयत झाले असून याप्रकरणी शितल रामा काठे (रा. खडकी, अकोले) आणि तीचा बाप मारुती नाना मुठे (रा. सातेवाडी, ता. अकोले) अशा दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा राजूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमनाथ कुलाळ हे अगदी साधारण कुटुंब, कोणाच्या अध्यात नाही ना मध्यात.! त्यांनी एका मुलीचा संभाळ केला आणि कालांतराने त्यांनी त्यात मुलीसोबत आपल्या समीर कुलाळ या मुलाचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. मात्र, हे संबंधित मुलीच्या एका नातेवाईकास मान्य नव्हते.

अर्थात या मुलीचा सांभाळ कुलाळ यांनी केल्यामुळे ते लग्नास बांधिल होते. मात्र, अचानक यांचे प्रेम ऊफाळून आले. कारण, समीर आणि पीडित मुलीचे प्रेम असल्यामुळे, त्यांच्यात अनेकदा शरिर संबंध आले होते. यात पीडित मुलगी गरोदर राहिली होती. लग्नास अवघे काही वय कमी असल्यामुळे, कुलाळ कुटुंब अडचणी होते.

दरम्यान, पीडित मुलीच्या नातेवाईकांनी या मुलीचा गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गर्भपात करु नका. आम्ही यांचे लग्न लावून देतो अशी विनंती मयत सोमनाथ आणि जिजाबाई यांनी केली होती. मात्र, दोन लाख रुपये उकळण्यासाठी ऐकतील ते नातेवाईक कसले.! त्यांनी पीडितेस लोणी रुग्णालयात दाखल करुन पुढील प्रक्रिया पार पाडली आणि तेथे जबाब

नोंदविल्यामुळे अल्पवयीन मुलगी असल्यामुळे समीर सोमनाथ कुलाळ याच्यासह त्याच्या आई वडिलांनी मदत केली असे म्हणत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत पोलिसांनी समीर कुलाळ यास अटक केल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी फार मोठा धसका घेतला होता.

घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला होता. त्यामुळे, पोस्को आणि अत्याचाराच्या गुन्ह्यात आपल्यासारख्या व्यक्तींची चुक नसताना नाव आले. मुलगा देखील जेलमध्ये गेला. नातेवाईक, गावातील लोक आणि आप्तेष्ट यांच्यात बदनामी झाली. त्यामुळे, सोमनाथ आणि जिजाबाई यांना फार मोठा सदमा बसला होता. आता मुलास बाहेर कसे काढायचे?

असा विचार करीत असताना शितल काठे व मारुती मुठे यांनी यांच्या हतबलतेचा फायदा घेतला. हा गुन्हा मिटवायचा असेल तर दोन लाख रुपये आणि दवाखाण्यात झालेला खर्च द्या. तेव्हा आम्ही केस मागे घेतो असा तगादा लावला. जर पैसे दिले नाही तर तुम्हाला केसमध्ये अडकवितो असे म्हणत कुलाळ कुटुंबास तगादा लावला.

दरम्यान, या घटनेत काही एक संबंध नसताना गुन्ह्यात नाव अडकविले गेले. ज्या मुलीचा संभाळ केला तिच्यामुळे कुटुंब अस्थिर झाले, पोटचा मुलगा जेलमध्ये जाऊन बसला, गावात इज्जत चव्हाट्यावर निघाली, नातेवाईकांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही, आता मुलास सोडवायचे तर दोन लाख रुपये द्यायला पैसे नाहीत. त्यामुळे, प्रचंड तनावाखाली

असणार्‍या सोमनाथ कुलाळ आणि जिजाबाई कुलाळ या दोघांनी मंगळवारी आपल्या राहत्या घरात आपले जीवण संपवून घेण्याचा निर्णय घेतला. या प्रकारानंतर दीपक कुलाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शितल कोठे व मारुती मुठे याच्यावर राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!