Saturday, October 23, 2021

लॉकडाऊनचे निर्णय करुन सरकारने जनतेला त्रस्त केले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्यावतीने उत्तर नगर जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांचा मेळावा आ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या मेळाव्यात नूतन पदाधिकार्‍यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, किसान मोर्चाचे प्रभारी जालिंदर वाकचौरे,

जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. रघुनाथ बोठे, अशोक पवार, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस नंदकुमार जेजूरकर, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकूंदराव सदाफळ, सभापती भाऊसाहेब जेजूरकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, बाळासाहेब डांगे, युवा मोर्चाचे अध्यक्ष सतिष बावके, उपसभापती ओमेश जपे,

बाळासाहेब जपे, जि. प सदस्या कविता लहारे, संगमनेर शहर अध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपूले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.राज्य सरकार मात्र कोविड संकटाच्या नावाखाली हात बांधून बसले आहे. केवळ लॉकडाऊनचे निर्णय करुन या सरकारने जनतेला त्रस्त केले. कवडीचीही मदत हे सरकार करु शकले नाही. राज्यात लसीकरण झाले ते सुध्दा प्रधानमंत्र्यांनी मोफत लस उपलब्ध करुन दिल्यामुळेच.

तुम्ही राज्यातील शेतकर्‍यांना काय दिले? असा सवाल उपस्थित करुन आ.विखे पाटील म्हणाले की, आघाडी सरकारच्या मंत्र्यांचा पर्दाफाश करण्याची जबाबदारी किसान मोर्चाला आता पार पाडावी लागणार आहे. आघाडी सरकारचे अपयश लोकांमध्ये जावून तुम्हाला सांगावे लागेल. एकीकडे तीन पक्षांचा आवाज आहे .

तर दुसरीकडे भाजप म्हणून आपला आवाज लोकांमध्ये जावून मजबुत करावा लागेल. केंद्र सरकारच्या योजनांची माहीती शेतकर्‍यांच्या बांधावर जावून द्या. यासाठी किसान मोर्चाची संवाद यात्रा सुरु करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी किसान मोर्चाचे प्रभारी जालिंदर वाकचौरे यांनी आ. विखे पाटील यांनी मुंबईमध्ये भरविलेल्या अ‍ॅग्रो अ‍ॅडव्हांटेज प्रदर्शनाची आठवण करुन देत कृषि मंत्री म्हणून सुरु केलेल्या योजनांची माहिती त्यांनी दिली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी पक्षाच्या आघाड्यांमधून केंद्र सरकारच्या कामाची माहिती

लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. किसान मोर्चाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सतिष कानवडे यांनी प्रास्ताविक केले.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!