Friday, October 22, 2021

या नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्य:मुस्लिम धर्मात अधिकृत तर हिंदू धर्मातील लोकांना अनधिकृत बायका

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुस्लिम धर्मात अधिकृत तर हिंदू धर्मातील लोकांना अनधिकृत बायका असतात. मुस्लिम समाजातील लोकांना दोन-दोन बायका असतात पण त्या अधिकृत असतात; परंतु हिंदू धर्मातील काही लोकांना अनधिकृत बायका असतात, असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

आठवले यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे. आठवले हे पंढरपूर दौऱ्यावर आले होते. येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी लोकसंख्या वाढीविषयी चिंता व्यक्त करत समान नागरी कायद्याला आपला पाठिंबा असल्याचेही स्पष्ट केले.

ते म्हणाले, देशाच्या हितासाठी समान नागरी कायदा आवश्‍यक आहे. मुस्लिम समाजाने या कायद्याविषयी उगाच बाऊ करण्याची गरज नाही. कोणत्याही एका धर्माच्या किंवा जातीच्या विरोधात हा कायदा नाही. समान नागरी कायद्यामुळे आरक्षणाला धक्का लागणार नाही. वाढती लोकसंख्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला मारक ठरत आहे.

लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात लोकसंख्या वाढ अधिक आहे. 100 कोटीवरून ती आता 150 कोटींपर्यंत गेली आहे. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी चीनच्या धर्तीवर कुटुंब नियोजनचा कायदा करण्याची आवश्‍यकता आहे. जागतिक लोकसंख्या वाढीच्या तुलनेत भारतात

लोकसंख्या वाढीचा वेग अधिक आहे. अलीकडच्या काही वर्षात तो अधिक वाढला आहे. लोकसंख्या वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी चीनच्या धर्तीवर एक कुटुंब, एक मुल असा कुटुंब नियोजनाचा नवा कायदा करण्याची गरज आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!