Friday, October 22, 2021

चर्चा तर होणार:स्नेहलता कोल्हे यांनी घेतली नगर जिल्ह्यातील या भाजपच्या जेष्ठ नेत्यांची भेट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील भाजपाचे जेष्ठ नेते असलेले पिचड कुटुंबीयांची भेट घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी पिचड यांना श्रद्धा व सबुरी असे लिहिलेली साईबाबांची शाल भेट दिली.

तसेच पिचडांचे आशीर्वाद घेतले. त्यांनी दिलेली श्रद्धा व सबुरीची शाल व मिळविलेल्या आशीर्वादाची चर्चा नगर जिल्ह्यात होती.अकोले येथे महिला संघटन कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी स्नेहलता कोल्हे आल्या असताना त्यांनी प्रथम माजी मंत्री मधुकर पिचड व हेमलता पिचड यांना भेटून शिर्डी येथील साईबाबांचा प्रसाद व श्रद्धा सबुरी या नावाची शाल भेट दिली.

त्यांनी माजी मंत्री मधुकर पिचड व हेमलता पिचड यांच्या अंगावर शाल टाकून आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. साहेब तब्येतीची काळजी घ्या राजकारणातील व समाजकारणात आपले काम आजही दिशादर्शक असून ज्या क्रांतिवीर राघोजी भांगरे यांनी आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी

इंग्रजांविरुध्द भूमिका घेतली त्यांचे नाव भंडारदरा जलाशयाला आपण देता ते योग्यच आहे. त्यास आपला पाठिंबा आहे. नाशिक-पुणे रेल्वे मार्ग अकोले येथून जाणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही करीत असलेले काम दिशादर्शक आहे.

उपस्थित कार्यकर्त्यांनी माजी मंत्री कोल्हे हे माजी मंत्री पिचड यांना जावई म्हणत असल्याची आठवण जागविली. हेमलता पिचड यांनी स्नेहलता कोल्हे यांचे औक्षण करून त्यांना शाल पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला.विधानपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पाश्वभूमीवर ही भेट महत्त्वाची ठरत आहे.

पिचड व कोल्हे दोन्ही कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. भाजपमध्ये आल्यापासून पिचडांचे राज्याच्या राजकारणातील महत्त्व कमी होत चालल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुकांत पिचडांची भुमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

पिचड यांच्या संपर्कात भाजपचे केंद्रीय नेतृत्व आहे. या दृष्टीने स्नेहलता कोल्हे यांच्या या राजकीय भेटीकडे पाहिले जात आहे.

ताज्या बातम्या

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...

नगरमध्ये दोन भावांकडून महिलेची छेडछाड लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत…

माय महाराष्ट्र न्यूज:दोन भावांनी एका विधवा महिलेची छेडछाड करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून विकास शामसुंदर गायकवाड...
error: Content is protected !!