Wednesday, October 27, 2021

हनी ट्रॅप च्या जाळ्यात एअर फोर्समधील निवृत्त अधिकारी अडकला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: पनवेल येथील व्यवसायिकाला हनी ट्रॅप मध्ये अडकवून मारहाण करत लुटल्याची घटना ताजी असतानाच, चंदननगर येथील एअरफोर्समधील एका निवृत्त अधिकार्‍याला हनी ट्रॅप मध्ये अडकवून लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला असून, त्यातील चौघांना अटक केली आहे.
दत्ता ऊर्फ यादव कुर्हाडे (वय ४८, रा. लवणवाडी, जुन्नर), उत्तम कान्हुजी कुर्हाडे (वय ४०) नारायण जाधव (वय ३७, रा. कैवानमळा, जुन्नर), अनिल ऊर्फ भाऊ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी हे एअर फोर्समधील निवृत्त अधिकारी

या प्रकरणी चंदननगर येथील एका (५९ वर्षीय) निवृत्त एअर फोर्स अधिकाऱ्याने फिर्याद दिली आहे.ते विमाननगर येथील युनियन बँक ऑफ इंडिया येथे गेले असताना संबंधित तरुणीने त्यांना फोन केला.त्‍यांच्‍याकडे नोकरीबाबत चौकशी केली. त्यावेळी फिर्यादी याने आपण व्यवसाय करीत असून माझ्याकडे नोकरी वगैरे नाही़ असे सांगितले.

यानंतर तिने व्हाटस अ‍ॅपवर त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांची सर्व माहिती घेऊन त्यांच्याबरोबर प्रेमाचे नाटक केले.त्यांना १२ ऑगस्ट रोजी नारायणगाव येथे बोलावले. तेथून ती त्यांना एका ठिकाणी घेऊन गेली. त्यांच्याबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी तेथे तिचे नातेवाईक आले. तेव्हा तिने निवृत्त एअर फोर्स अधिकाऱ्याने आपल्यावर जबरदस्तीने शरीर संबंध केल्याचे खोटे सांगितले.त्यांच्यातील एकाने फिर्यादी यांच्या गळ्याला कुर्‍हाड लावून त्‍यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!