Monday, October 18, 2021

रावसाहेब दानवेंचा टोला:गावात जातं आणि फुटाणे फेकत बसतं

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मतदारसंघातील सत्कार सोहळ्यात जोरदार बॅटिंग केली. सिल्लोडमध्ये झालेल्या सत्कार सोहळ्यात रावसाहेब दानवेंनी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना टोले लगावले. मतदारसंघात सध्या बाबर शिरला आहे.

तो नागरिकांना आमिष दाखवत आहे, असं रावसाहेब दानवे सत्तारांना उद्देशून म्हणाले.  अब्दुल सत्तार खूप झालं, 50 कोटी रुपये आणील, मात्र आपण एकच रस्ता 2400 कोटींचा केला. अब्दुल सत्तार आणि माझे पैसे एकत्र करू म्हणावं, मग बघू कोण हरतं ते, असं आव्हानही दानवेंनी दिलं.

चिरीमिरीचं नाही खेळावं. गावात जातं आणि फुटाणे फेकत बसतं, शिवसेनेची शाखा काढत बसतं. मात्र या शिवसेनेच्या शाखा नाहीत, या सत्तारच्या शाखा आहेत. सत्तारला माझं चॅलेंज आहे सिल्लोड तालुक्याचा जिल्हा करून दाखवा, मी पाठीशी आहे, असंही रावसाहेब दानवे म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रिपादाचा भार स्वीकारल्यानंतर रावसाहेब दानवे पहिल्यांदाच 17 ऑगस्ट रोजी औरंगाबादेत दाखल झाले. मी आज पहिल्यांदा रेल्वे मंत्री झाल्यानंतर मराठवाड्यात आलो, माझ्या कार्यकर्त्यांना आनंद झाला त्यांनी माझा सत्कार केला, मी कार्यकर्त्यांच्या बळावर मी इथपर्यंत पोचलो, मलाही आनंद वाटला, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली होती.

मराठवाडा निजामाच्या ताब्यात होता, जिथे इंग्रज होते तिथे रेल्वेचं जाळ तयार झालं, मराठवाड्यातल्या रेल्वेचे अनेक महत्वाचे प्रश्न सोडवणार आहे. नागपूर मुंबई हा सर्वाधिक वापरला जाऊ शकणार रेल्वे मार्ग बनू शकतो, तो बुलेट ट्रेन मार्ग जर तयार झाला तर

मुंबईहून औरंगाबादला दीड तासात आणि नागपूरला 3 तासात आपण पोहोचू शकतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काम ते होऊ शकतं, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!