Monday, October 25, 2021

महाराष्ट्रात तालिबानी राजवट?” नगरमधील ‘त्या’ प्रकारावरून भाजपाची सरकारवर टीका!

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अफगाणिस्तानवर नुकताच तालिबाननं बंदुकीच्या जोरावर ताबा मिळवला असून तिथलं सरकार उलथवून टाकलं आहे. जागतिक स्तरावर तालिबानच्या या कृतीवर संताप व्यक्त केला जात असताना महाराष्ट्रात तालिबानी राजवट आहे का? असा सवाल भाजपाकडून विचारण्यात आला आहे.

अहमदनगरमध्ये महानगरपालिकेकडून एका पत्रकाराला हसन मुश्रीफ यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नासंदर्भात नोटीस पाठवण्यात आल्यामुळे भाजपाकडून त्यावर तीव्र शब्दांत टीका करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केलं आहे. शिवाय, सोबत त्यांनी महानगरपालिकेकडून संबंधित पत्रकाराला बजावण्यात आलेली नोटीस देखील शेअर केली आहे.

केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्वीटमध्ये राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. “महाराष्ट्रात तालिबानी राजवट? पत्रकारांनो, प्रश्न विचाराल तर नोटीस पाठवू. हसन मुश्रीफ यांना लसीकरणाबाबत प्रश्न विचारला, म्हणून शिवसेनेचेच महापौर असलेल्या अहमदनगर येथे १५ ऑगस्टला सामना चे प्रतिनिधी मिलिंद देखणे यांनी प्रश्न विचारले, म्हणून त्यांना महापालिकेने नोटीस पाठवली”, असं आपल्या ट्वीटमध्ये केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

केशव उपाध्ये यांनी शेअर केलेल्या पालिकेच्या नोटिशीत म्हटल्याप्रमाणे, १५ ऑगस्ट रोजी हसन मुश्रीफ यांची अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये संबंधित पत्रकाराने शहरातील लसीकरण केंद्रांमधून लस बाहेर विकली जाते, अशी प्रश्नवजा तक्रार केली. मात्र, एकीकडे महापालिका कर्मचारी, आरोग्यसेवक लसीकरण सर्वांपर्यंत पोहोचावं

यासाठी अथक मेहनत घेत असताना असा प्रश्न विचारणे या सर्व कर्मचाऱ्यांचा उत्साह आणि मनोबल खच्ची करणारं आहे. त्यामुळे नेमक्या पालिकेच्या कोणत्या आरोग्य केंद्रामध्ये, कधी व कोणत्या कर्मचाऱ्याकडून असे प्रकार घडले, याची इत्थंभूत माहिती आणि पुरावे ३ दिवसांत लेखी स्वरूपात कार्यालयात सादर करावेत, असे आदेश या नोटिशीमध्ये देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!